Why Does Ice Float on Water छत्रपती संभाजीनगर : कोणतीही जड वस्तू पाण्यावर टाकल्यावर ती बुडते. मात्र पाण्यापासून तयार झालेला बर्फ किती ही वजनदार असला तरी पाण्यात बुडत नाही. गूढ वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला विज्ञानात सापडते.
Why Is Ice Less Dense Than Water?
बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याचे घनत्व पाण्याच्या तुलनेत कमी असते. घनत्त्व म्हणजे एका विशिष्ट वस्तुमानासाठी लागणाऱ्या जागेचे मोजमाप. जेव्हा पाणी थंड होऊन बर्फात रूपांतरित होते. तेव्हा त्याचे अणु एका विशिष्ट पद्धतीने रचले जातात ज्याला ‘क्रिस्टल स्ट्रक्चर’ असे म्हणतात. या रचनेमुळे बर्फ अधिक फुगलेला म्हणजेच कमी सघन होतो.
त्यामुळेच, त्याच वजनाचा बर्फाचा तुकडा पाण्याच्या तुलनेत अधिक जागा व्यापतो म्हणूनच तो पाण्यावर तरंगतो. मात्र सर्वच द्रवांमध्ये तरंगत नाही. जसे की अल्कोहोल यांसारख्या पदार्थांचे घनत्व पाण्याच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे त्या पदार्थांमध्ये बर्फ टाकला तर तो बुडतो किंवा ग्लासाच्या तळाशी जातो.
पाण्यावर बर्फ तरंगने निसर्गाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. जसे थंड हवामानात तलाव किंवा नदी गोठली, तरी फक्त वरचा थरच बर्फाचा होतो, कारण तो पाण्यावर तरंगतो. त्याखालचा पाणीथर द्रव अवस्थेतच राहतो. त्यामुळे त्यातल्या जलचर प्राण्यांचे जीवन सुरक्षित राहते.
Read About : Minestrone Soup History : स्वयंपाकघरातून महागड्या हॉटेलच्या मेनूपर्यंत…
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.