Ad Advertisement Ad Advertisement

Bicycle License in India 2026 – एकेकाळी सायकल चालवण्यासाठीही लागायचा परवाना!

दोन रुपये होते शुल्क : दरवर्षी नूतनीकरण करावे लागे

मुंबई : Bicycle License in India – आज दुचाकी किंवा कार चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स लागते. ते नसेल तर दंड ठोठावला जातो. पण ब्रिटिश काळापासून स्वातंत्र्यानंतरच्या अनेक दशकांपयंर्त भारतातील बहुतेक शहरांत सायकल ठेवण्यासाठी आणि चालवण्यासाठीही नोंदणी आणि परवाना घेणे सक्तीचे होते. सध्या अशाच एका सायकल परवान्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नगरपालिका, पंचायत समिती किंवा कॅन्टोन्मेंट बोर्ड हा परवाना द्यायचे. त्याची मुदत फक्त एक वषार्ची असल्याने दरवर्षी नवा परवाना काढावा लागे. बहुतेक ठिकाणी फी फक्त दोन रुपये होती, तरीही दरवर्षी नूतनीकरण करावे लागे. परवाना मिळाल्यावर पितळ किंवा ॲल्युमिनियमचा छोटा टॅग मिळायचा. तो सायकलच्या हेड ट्यूबवर किंवा फ्रेमवर लावणे बंधनकारक होते. परवान्याशिवाय सायकल चालवताना पकडले गेले तर स्थानिक कर्मचारी दंड वसूल करायचे. तेव्हा वाहतूक पोलिसांसारखी व्यवस्था नव्हती, म्हणून नगरपालिका किंवा पंचायतीचे कर्मचारीच रस्त्यावर तपासणी करायचे. रात्री सायकलला दिवा लावणेही गरजेचे होते, नाहीतर परवाना मिळत नसे. महसूल गोळा करणे आणि काही प्रमाणात वाहतूक नियंत्रण, हा या व्यवस्थेचा उद्देश होता.

तेव्हा होती चैनीची वस्तू

आज सायकलसाठी परवाना लागत नाही. पण १९४० च्या दशकात सायकल ही चैनीची वस्तू मानली जायची. विशेषत: गावांत आणि छोट्या शहरांत सायकल असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. म्हणून सरकार आणि स्थानिक संस्था तिची नोंदणी करून कर घ्यायच्या. १९५० ते ६० च्या दशकातही ही पद्धत पंजाब, हरयाणा, मद्रास (चेन्नई), केरळ, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यांत सुरू राहिली. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीपयंर्त ती हळूहळू बहुतेक ठिकाणी बंद झाली. मोटार वाहन कायद्यानंतर लक्ष फक्त मोटार वाहनांवर गेले आणि सायकल या नियमातून मुक्त झाली.

जुन्या आठवणी

अनेक वृद्ध लोक आजही सांगतात की सायकल घेतल्यावर सर्वात आधी परवाना काढावा लागायचा. बाजारातून सायकल आणल्या आणल्या पंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात रांग लावावी लागे. फी भरल्यावर टॅग मिळायचा आणि तो सायकलवर चमकत राहायचा. आज मोफत सायकल चालवताना हे ऐकून विचित्र वाटते, पण त्या काळात ही गोष्ट अगदी सामान्य होती.

Read About : Malena and Klepetan Story : मालेनानंतर क्लेपेटानला मिळाली ‘स्नायका’ची साथ; स्टजेपन व्होकिच यांची माणुसकीची कहाणी पुन्हा चर्चेत, 2026
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.