वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या वाढत्या प्रमाणामुळे गव्हातील ग्लूटेन आणि एटीआय प्रथिनांमध्ये बदल होण्याची शक्यता
नवी दिल्ली : Climate Change Wheat Protein वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे (सीओ २) वाढते प्रमाण गव्हातील प्रोटीनची (प्रथिनांची) रचना लक्षणीयरीत्या बदलू शकते. यामुळे गव्हापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या (उदा. पाव, चपाती) गुणवत्तेवरच नव्हे, तर मानवी पचन आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा एका नवीन अभ्यासातून देण्यात आला आहे.
जर्मनीतील ‘लाइबनिझ इन्स्टट्यिूट फॉर फूड सिस्टीम बायोलॉजी’ आणि म्युनिक तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या संशोधकांनी हा अभ्यास केला असून, त्याचे निष्कर्ष ‘फूड केमिस्ट्री’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
अभ्यासातील महत्त्वाचे निष्कर्ष
Climate Change Wheat Protein ‘ेसीओ २’ चे वाढते प्रमाण: वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण १९८० मधील ३४० पीपीएम वरून २०२४ मध्ये ४२५ पीपीएमपर्यंत वाढले आहे. २०५० पर्यंत हे प्रमाण ६०० पीपीएमवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
गव्हातील प्रथिनांमध्ये बदल: वाढत्या कार्बन डायऑक्साइडच्या प्रभावामुळे गव्हामध्ये ‘अमायलेज/ट्रिप्सिन-इन्हिबिटर्स’ (एटीआय) या घटकाचे प्रमाण वाढते, तर ‘ग्लूटेन’चे प्रमाण कमी होते. Climate Change Wheat Protein
असा होणार परिणाम
पचनाच्या समस्या: गव्हात एटीआयचे प्रमाण वाढल्यामुळे मानवी पचनसंस्थेवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
ग्लुटेनचे प्रमाण कमी होणार : गव्हातील ‘ग्लूटेन’चे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यापासून बनवल्या जाणाऱ्या पावाची किंवा चपातीची गुणवत्ता घसरते.
भविष्यातील आव्हाने आणि पर्याय
संशोधिका सब्रिना गेस्लिट्झ आणि प्रा. कॅथरिना शेर्फ यांनी स्पष्ट केले की, हे बदल गव्हाच्या वाणानुसार वेगवेगळे दिसून येतात. त्यामुळे भविष्यात हवामान बदलांचा सामना करताना केवळ गव्हाचे जास्त उत्पादन घेण्यावर भर न देता, अशा वाणांची निवड व पैदास करणे गरजेचे आहे जे वाढत्या सीओ २ मध्येही आपली उत्कृष्ट गुणवत्ता टिकवून ठेवतील, आरोग्यास त्रासदायक ठरणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण कमी ठेवतील.
हवामान बदलाच्या काळात कृषी संशोधनाने केवळ धान्याच्या प्रमाणावर नव्हे, तर त्याच्या पोषक गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे संशोधकांनी अधोरेखित केले आहे. Climate Change Wheat Protein
Read About: Zombie Cells : शरीरातील ‘झोम्बी पेशी’ रोगप्रतिकारक यंत्रणेपासून कशा लपतात? PD-L2 प्रथिनाचा महत्त्वाचा शोध
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.