राजस्थानच्या डूंगरपूरमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४.९५ लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त, सहा जणांना अटक
डूंगरपूर (राजस्थान) : Fake Currency Printing Gang शाहिद कपूरच्या प्रसिद्ध फर्जी वेब सीरिजपासून प्रेरित होऊन हुबेहूब बनावट नोटा छापणारी टोळी राजस्थानच्या डूंगरपूरमध्ये पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंतरराज्यीय कारवाई करत ६ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सर्व बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त केले आहे.
३ वर्षांचे नियोजन अन् चीनचा कागद
हरियाणाच्या अंबाला येथील रहिवासी आनंद राजपूत उर्फ करण याने २०२३ मध्ये फर्जी सीरिज पाहिल्यानंतर नकली नोटा छापण्याचा कट रचला. त्याने तब्बल तीन वर्षे याचे नियोजन केले. बँक नोटांचा अचूक रंग आणि डिझाइन सेट करण्यासाठी त्याने युट्यूबवरून फोटोशॉपचे तंत्र शिकून घेतले. मात्र, नोटांसाठी लागणारा विशेष हाय-जीएसएम कागद भारतात मिळत नसल्याने, त्याने तो थेट चीनच्या एका ई-कॉमर्स वेबसाईटवरून भारतात मागवून घेतला.
भागीदाराचा विश्वासघात
आनंदने सोशल मिडीयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या रवी कुमार मिश्राला आपल्यासोबत घेतले आणि नोटा छापण्याचे काम त्याच्याकडे सोपवले. मात्र, रवीने चलाखी करून आनंदला छापलेल्या नोटांऐवी साधे कागद पार्सल केले आणि त्याला सोशल मीडियावर ब्लॉक करून स्वतः या टोळीचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) बनला.
राजस्थानमधील खोली अन् ४.९५ लाखांची छपाई
रवीने पुढे सोशल मिडीयावरून राजस्थानच्या डूंगरपूरमधील नयन जोशी आणि भावेश खटीक यांना संपर्क साधला. नोटांचा उत्कृष्ट दर्जा पाहून त्यांनी डूंगरपूरमध्ये एक खोली भाड्याने घेतली. तिथे प्रिंटर, विशेष शाई आणि नोटा मोजण्याचे मशीन आणून त्यांनी तब्बल ४,९५,५०० रुपयांच्या नकली नोटा छापल्या.
पोलिसांचा १३०० किमीचा पाठलाग
२९ सप्टेंबर रोजी नयन आणि भावेश जेव्हा पहिल्या खेपेची डिलिव्हरी देण्यासाठी माडा शाळा मैदानावर पोहोचले, तेव्हा पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. आपले साथीदार पकडले गेल्याचे समजताच मुख्य सूत्रधार रवी फरार झाला. एसपी मनीष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल आणि विशेष पथकाने सलग ३ दिवस आणि तब्बल १३०० किलोमीटरचा थरारक पाठलाग केला. अखेर रवी प्रयागराजला पळून जाण्याच्या तयारी असताना, पोलिसांनी त्याला पंजाबच्या लुधियाना रेल्वे स्थानकावरून बेड्या ठोकल्या.
Read About : Marriage Scam Gevrai Fake Aadhaar Card विवाहाच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; अल्पवयीन मुलीची सुधारगृहात रवानगी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.