Why Naval Ships Are Grey नवी दिल्ली : वायुदल, पायदळ तसेच नौसेना कोणत्याही राष्ट्रसाठी बळकट असणे गरजेचे आहे. यामध्ये ज्या देशांना समुद्र किनारा आहे. त्यांच्यासाठी नौदल सूरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असते. शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नौदलाच्या जहाज उपयुक्त असतात. बहुतेक वेळा नौदलाची जहाजे राखाडी रंगाची असतात. त्याविषयी माहिती जाणून घेऊया.
Why Naval Ships Are Grey : राखाडी रंगाची निवड ही फक्त रंगसौंदर्यासाठी नव्हे, तर विशिष्ट रणनीतीमुळे करण्यात आलेली आहे. समुद्र आणि आकाश यांच्यातील नैसर्गिक छटा प्रामुख्याने निळसर, पांढरट आणि राखाडी स्वरूपाच्या असतात. त्यामुळे जेव्हा जहाज राखाडी रंगाचे असते, तेव्हा ते या पार्श्वभूमीत मिसळून जाते. विशेषत: ढगाळ वातावरण, समुद्रातील धुके किंवा सूर्यप्रकाशाच्या प्रतिबिंबात, हे जहाज सहजपणे ओळखता येत नाही. अशा वेळी शत्रूंसाठी या जहाजांना लांबून लक्ष करणे अवघड होऊन जाते.
Why Naval Ships Are Grey : राखाडी रंगाचा आणखी एक फायदा म्हणजे तो सूर्यप्रकाश कमी प्रमाणात परावर्तित करतो. त्यामुळे जहाजावरून प्रकाशाची चमक दूरवर जात नाही आणि जहाज लपून राहण्यात यशस्वी ठरते. युद्धाच्या परिस्थितीत शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी ही खूपच महत्त्वाची गोष्ट ठरते.
राखाडी रंगावर धूळ, गंज किंवा मीठाचे डाग इत्यादी सहजपणे दिसत नाहीत. समुद्रात सातत्याने राहणाऱ्या जहाजांसाठी ही बाब खूप फायदेशीर ठरते. यामुळे देखभालीलासाठी कमी वेळ लागते आणि जहाजाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. शिवाय, हा रंग जास्त उष्णता शोषत नाही, त्यामुळे जहाजाच्या आतील तापमान तुलनेत नियंत्रित राहते. यामुळेच जागतिक पातळीवर बहुतेक नौदल राखाडी रंगाचा स्वीकार करतात.
Read About : Ghee on Rice Benefits – भातावर तूप का घ्यावं?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.