Ad Advertisement Ad Advertisement

Nana Patekar Death : रात्री २.३० वाजता मित्राला मेसेज; पहाटे घरात बेशुद्धावस्थेत आढळले

रुग्णालयात पोहोचेपर्यंत सुरू होता CPR; डॉक्टरांनी तासभर केले उपचार

पणजी : Nana Patekar Death ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अखेरच्या काही तासांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मणिपाल रुग्णालयाचे डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकरांना मध्यरात्रीपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यांनी रात्री सुमारे २.३० वाजता आपल्या मित्राला मेसेज करून प्रकृती ठीक नसल्याचे कळवले होते.
रात्र असल्याने मित्राच्या लक्षात हा मेसेज तत्काळ आला नाही. मात्र, मेसेज पाहताच ते पहाटे सुमारे ४ वाजता नाना पाटेकरांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी नाना फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते आणि त्यांना मोठ्या प्रमाणात घाम फुटला होता.

मित्राने तातडीने केअरटेकरला बोलावले आणि रुग्णवाहिका मागवण्यात आली. रुग्णालयाच्या माहितीनुसार, पहाटे ४.१८ च्या सुमारास केअरटेकर रुग्णवाहिकेसाठी आला, तर ४.२० पर्यंत रुग्णवाहिका त्यांच्या निवासस्थानी पोहोचली.

रुग्णालयातही तासभर जीव वाचवण्याचे प्रयत्न

नाना पाटेकर प्रतिसाद देत नसल्याने वैद्यकीय पथकाने घटनास्थळीच सीपीआर सुरू केला आणि त्याच अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पहाटे ४.३० च्या सुमारास ते रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतरही डॉक्टरांनी सुमारे तासभर सीपीआरसह उपचार सुरू ठेवले. मात्र, पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती डॉ. साळकर यांनी दिली. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित नव्हते; केअरटेकर आणि मित्रपरिवार त्यांच्या सोबत होता, असेही डॉक्टरांनी सांगितले.

शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचा निर्णय

मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रंगभूमी तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाचा गौरव करत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले.

नाना पाटेकर यांनी ‘गमन’मधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘परिंदा’ आणि ‘क्रांतीवीर’साठी राष्ट्रीय पुरस्कार, ‘पद्मश्री’सह ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘राजनीती’, ‘वेलकम’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला.

Read About : Kareena Kapoor King Movie – ‘किंग’ मध्ये करीना कपूरची खास एन्ट्री

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.