१० ऑक्टोबरला शनि अमावस्या; शनिदेवांची उपासना, दानधर्म आणि देशातील प्रसिद्ध शनि मंदिरांविषयी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
छत्रपती संभाजीनगर : Shani Amavasya 2026 शनिदेव म्हटले की अनेकांच्या मनात साडेसाती, ढैय्या आणि संकटांची भीती निर्माण होते. मात्र, हिंदू धार्मिक मान्यतांनुसार शनिदेव हे न्याय आणि कर्मफल देणारे देव मानले जातात. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारे दैवत म्हणून त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे शनिदेवांना केवळ संकटांशी जोडून न पाहता शिस्त, प्रामाणिकपणा आणि सत्कर्मांचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते.
मित्रांनो, जेव्हा शनिवारी अमावस्या येते, तेव्हा त्याला ‘शनि अमावस्या’ म्हणतात. हा योग खूप दुर्मिळ असतो. दहा ऑक्टोबरला असाच एक शुभ योग जुळून आला आहे.ज्या लोकांच्या पत्रिकेत साडेसाती किंवा ढैया सुरू आहे, त्यांच्यासाठी हा दिवस वरदान आहे. या दिवशी केलेल्या उपायांनी शनिदेव लवकर प्रसन्न होतात. या दिवशी केलेले दान, स्नान आणि पूजा इतर दिवसांपेक्षा हजार पटीने जास्त फळ देते. तुमचे रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे.”
“अनेकांच्या मनात शनि देवांबद्दल भीती असते. पण मित्रांनो, शनि देव क्रूर नाहीत. ते न्यायाचे देवता आहेत. त्यांना आपल्या कर्मांचे ‘न्यायाधीश’ म्हटले जाते.ते कोणावरही विनाकारण अन्याय करत नाहीत. जे लोक चांगले काम करतात, गरिबांना मदत करतात आणि प्रामाणिक राहतात, त्यांना शनि देव नेहमी राजासारखे वैभव देतात. पण जे लोक चुकीचे वागतात, त्यांना शनी देव शिक्षा देतात. म्हणजेच शनी देव आपल्याला शिस्त शिकवतात आणि सन्मार्गावर आणतात. त्यामुळे त्यांना घाबरू नका, त्यांचा आदर करा.”
अनेकांना प्रश्न पडतो,शनि देवांची भक्ती कशी करावी?
- “शनि देवांना प्रसन्न करणे खूप सोपे आहे. शनि अमावस्येला तुम्ही घरी किंवा मंदिरात हे सोपे उपाय करू शकता:
- पहाटे उठणे: सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ कपडे घाला.
- पिंपळाच्या झाडाची पूजा: संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. झाडाला प्रदक्षिणा घाला. असे केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात.
- शनि मंत्रांचा जप: ‘ओम शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. हनुमान चालिसाचे वाचन करा, कारण हनुमानाच्या भक्तांना शनी देव कधीच त्रास देत नाहीत.
- दानाचे महत्त्व: सर्वात महत्त्वाचे म्हणजे दान. उद्याच्या दिवशी काळे तीळ, काळे कपडे, चप्पल किंवा गरजू लोकांना अन्न दान करा. गरीबांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून शनि देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील.”
- आता जाणून घेऊया भारतातील शनि देवांच्या प्रमुख मंदिरांबद्दल, जिथे दर्शनासाठी लाखो भाविक येतात:
१. शनी शिंगणापूर (महाराष्ट्र):
हे जगातील सर्वात प्रसिद्ध शनि मंदिर आहे. येथील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या गावात एकाही घराला कुलूप किंवा दरवाजा नाही. येथे शनि देव स्वतः गावाची रक्षा करतात, अशी श्रद्धा आहे. येथील शनी मूर्ती उघड्या आकाशाखाली आहे. शनी महाराजांच्या साडेसातीचा किंवा दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाविक येथे येऊन मूर्तीवर मोहरीचे किंवा तिळाचे तेल अर्पण करतात.शनिवार आणि अमावस्या एकत्र येणाऱ्या दिवसाला आणि शनी जयंतीला येथे लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात.
२. श्री शनि महाराज मंदिर, राक्षसभुवन (बीड)
बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे गोदावरी नदीच्या काठावर हे मंदिर आहे. या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा असून शनिदोषा निवारणासाठी आणि साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक भाविक येथे दर्शनाला येतात.
३. श्री शनि मंदिर, वर्दडी (चांदवड, नाशिक)
हे जगातील अत्यंत दुर्मिळ मंदिर मानले जाते जेथे शनिदेव, राहु आणि केतु हे तिन्ही ग्रह एकाच ठिकाणी एकत्र विराजमान आहेत.एका सुंदर दरीत आणि धबधब्याजवळ हे मंदिर वसलेले आहे. पौराणिक कथेनुसार, उज्जैनचे महान राजे विक्रमादित्य यांनी आपल्या साडेसातीचा काळ याच भागात व्यतीत केला होता. शनिवारच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
४.शनिचरा मंदिर (ग्वाल्हेर, मध्य प्रदेश):
असे मानले जाते की हे मंदिर खूप जुने आहे. येथील शनी पिंड आकाशातून पडलेल्या उल्केपासून बनली आहे. येथे दर्शनाला आल्यावर लोक आपले जुने कपडे आणि चपला मंदिरातच सोडून जातात, जेणेकरून त्यांचे दारिद्र्य दूर होईल.
५. तिरुनल्लर शनी मंदिर (तामिळनाडू):
- हे दक्षिण भारतातील अतिशय जागृत स्थान आहे. येथे ‘नल तीथर्म’ नावाचा पवित्र तलाव आहे. या तलावात स्नान करून शनि देवाचे दर्शन घेतल्यास साडेसातीचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो, अशी मान्यता आहे.”
- “तर मित्रांनो, आता आलेली शनि अमावस्या अजिबात वाया घालवू नका. मनोभावे शनी देवाचे स्मरण करा. कुणाचाही अपमान करू नका आणि नेहमी चांगले कर्म करा. शनि देव नक्कीच तुमच्यावर कृपा करतील.
Read About : Maharashtra Missing Women – महाराष्ट्रातून हजारो महिला-मुली बेपत्ता; नेमकं पुढे काय होतं?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.