मिनी सब-ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर : Softball Championship Semifinals- भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन आणि अहिल्यानगर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिनी सब-ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत दुसऱ्या दिवशी विविध संघांमध्ये चुरशीचे सामने रंगले. महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांच्या मुला-मुलींच्या संघांनी दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव प्रवीण अनावकर, प्रदीप तळवेलकर, गोकुळ तांदळे, अतुल निकम, विरूपक्ष रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसभर झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, वेगवान खेळ आणि सांघिक समन्वयाचे प्रदर्शन केले. मुलांच्या गटात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशचा २-१ असा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. दिल्लीने पंजाबवर ९-२, तर तेलंगणाने गुजरातवर ५-२ अशी मात केली. अन्य सामन्यात पंजाबने राजस्थानचा १३-० असा एकतर्फी पराभव केला. तसेच दिल्लीने मध्यप्रदेशवर ८-६ अशी मात करत आपली आगेकूच कायम ठेवली. मुलींच्या आंध्रप्रदेश संघाने पंजाबर ३-२, मध्यप्रदेशने केरळ संघावर ६-४, तेलंगना संघाने आंध्रप्रदेशवर ६-२ अशी मात केली.
Read About : Finals National Tennis – राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राची मायरा शेख चमकली
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.