Ad Advertisement Ad Advertisement

Latur courier parcel blast- लातुरात कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी

वाहनाचे छत आणि काचा निखळून पडल्या

Latur courier parcel blast: लातूर : शहरातील उद्योगभवन परिसरातील एका कुरिअर सर्व्हिसमध्ये पार्सलचा भीषण स्फोट झाल्याची घटना शनिवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी दहाच्या सुमारास घडली. यात एक तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बाहेरगावाहून आलेले पार्सल वितरण करण्यासाठी वाहनामध्ये भरत असताना झालेल्या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली होती.

उद्योगभवन येथील उमाटे कुरिअरमध्ये गुरुवारी रात्री वाहनातून आलेले पार्सल काढून ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा वाहतूक करणाऱ्या वाहनात भरण्यात आले. शनिवारी सकाळी छोटा हत्ती वाहनातून हे पार्सल बाहेर काढताना अचानक स्फोट झाला. या घटनेत पार्सल वाहनामध्ये टाकणारा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. स्फोटामुळे वाहनाचे छत आणि काचा निखळून पडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाणे, बॉम्ब शोधक, फॉरेन्सिक पथक, श्वान पाथक दाखल झाले. या पार्सलमध्ये छर्रे, एअर गन तसेच ज्वलनशील वस्तू असल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगरहून आले होते पार्सल

उमाटे कुरिअरमध्ये आलेले हे पार्सल छत्रपती संभाजीनगरहून आल्याचे सांगण्यात येत आहे. येथील बंदूकघर या फटाके दुकानाने ते मागविले होते. दोन दिवसांपूर्वी लातुरात दाखल झालेले हे पार्सल संबंधित दुकानदाराला पोहचविताना ही दुर्घटना घडली.

पाच ते सहा कर्मचारी होते कामावर

शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ५ ते ६ कर्मचारी छोटा हत्ती वाहनातून आलेले पार्सल काढत होते. तेव्हा अचानक वाहनातच हा स्फोट झाला. जाळ अन् धूर एकाच वेळी निघाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. तर वाहनात असलेला प्रकाश नागनाथ स्वामी हा कामगार गंभीर जखमी आहे.

Read About : Maharashtra farmers foreign study tour amid drought – दुष्काळ असतानाही कृषी खात्याचा शेतकऱ्यांसाठी परदेश दौरा

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.