नशामुक्त युवा फॉर विकसित भारत
Drug-Free Youth Programme in Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : माय भारत आणि संत रोहिदास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पडोस युवा संसद कार्यक्रम ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन किलेअर्क भागातील संत रोहिदास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे करण्यात आले होते. व्यसनमुक्त भारताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करण्यासह निरोगी आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. एम. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, फौजदार उत्तरेश्वर मुंढे, नशाबंदी मंडळाचे जिल्हा व मराठवाडा संघटक भाऊसाहेब पठाडे, मानवाधिकार समितीचे शेख रशीद, कार्यक्रम समन्वयक प्रकाश त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यसनांपासून दूर रहा
प्रास्ताविक प्रकाश त्रिभुवन यांनी केले. अमली पदार्थ प्रतिबंध विभागाचे निरीक्षक सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणामांबाबत माहिती दिली. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या ऊर्जेचा उपयोग सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्मितीसाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले.भाऊसाहेब पठाडे यांनी व्यसनांमुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम अधोरेखित करून त्यावरील उपाय यावर मनोरंजक पद्धतीने युवकांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महत्वाचे मुद्दे
Read More : Workplace Safety Ergonomics CMIA – कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी अर्गोनॉमिक्स महत्त्वाचे
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.