आ. अब्दुल सत्तार यांना धक्का : दादाराव वानखेडे यांची निवड निश्चित; आज बैठक
Abdul Gaffar resignation छत्रपती संभाजीनगर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महायुतीविरुद्ध भूमिका घेतल्याचा फटका आ. अब्दुल सत्तार यांना बसला आहे. आ. सत्तार यांचे बंधू अब्दुल गफार यांनी अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू होताच जिल्हा मजूर कामगार संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी सोमवारी (दि.२) संचालकांची बैठक बोलाविण्यात आली आहे. १८ पैकी ११ संचालक सहलीवर गेले असून, दादाराव वानखेडे यांची अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आ. अब्दुल सत्तार यांनी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना थेट विरोध दर्शविला. आ. सत्तारांच्या या भूमिकेमुळे मजूर संघाच्या महायुतीच्या संचालकांनी त्यांचे बंधू अब्दुल गफार यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यापूर्वीच गफार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नवीन अध्यक्ष निवडीसाठी मजूर संघाच्या कार्यालयात सोमवारी संचालकांची बैठक बोलाविण्यात आली आहे. दुपारी ११.३० ते २ वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज विक्री, स्वीकृती, छाननी ही प्रक्रिया होईल. गरज पडल्यास दुपारी ३ वाजता मतदान व नंतर मतमोजणी होईल.
११ संचालक सहलीवर
अध्यक्ष निवडीपूर्वी मजूर संघाच्या १८ पैकी ११ संचालक सहलीवर गेले आहेत. याशिवाय इतर ३ संचालक आमच्या सोबत आहेत. दादाराव वानखेडे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप पाटील बनकर यांनी दिली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश गायकवाड यांनी मजूर संघातील सत्तांतरासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Climate Change Wheat Protein : वाढत्या CO₂ मुळे गव्हातील प्रथिनांमध्ये बदल, चपातीची गुणवत्ता खराब होणार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.