Ad Advertisement Ad Advertisement

INDIA Bloc Rally Against SIR – नवा इतिहास व देशात परिवर्तन घडवू!

रामलीला मैदानावर विरोधक कडाडले

INDIA Bloc Rally Against SIR : नवी दिल्ली : ‘मतदारयादी विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) प्रक्रिया’ रद्द करणे व देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करीत रामलीला मैदानावर विराट सभा घेत विरोधकांनी नवा इतिहास घडवणे व देशात परिवर्तन घडवण्याचा संकल्प सोडला आहे. या सभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राजद, डावे, नॅशनल कॉन्फरन्स यांसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी एकसुरात केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

एसआयआरमधून आम्हाला हरवले- ममता

नवी दिल्ली : मतदारयादी विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) हे भाजपसाठी ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिलिफ’ बनले. बंगालमध्ये एक कोटी मतदारांना वगळून ही निवडणूक हायजॅक करण्यात आली. आम्ही निवडणूक हरलो नाही तर आम्हाला हरवले गेले. आम्ही याचा बदला राजकीय आणि लोकशाही मार्गाने घेऊ, असे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे ‘व्हॅनिश कुमार’ असून त्यांनी केवळ मतच नव्हे, तर मतमोजणीही ‘मॅनेज’ केली, असा आरोप त्यांनी केला. लहान मुलांच्या प्रसिद्ध कवितेच्या धर्तीवर ‘व्हॅनिश व्हॅनिश यस पापा’ असे म्हणत ममतांनी कुमार यांची खिल्ली उडवली. ‘भाजप का साथ, सबका सत्यानाश’ असा टोलाही त्यांनी लगावला.

‘वोटर व चिटर’ यांच्यात लढा- तेजस्वी

नवी दिल्ली : देशात सध्या वोटर आणि चिटर (फसवणूक करणारे) यांच्यात लढा सुरू असून लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करावा, असे आवाहन राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा आणि त्यांना तुरुंगात पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही लोकशाहीचा अंत होऊ देणार नाही. रामलीला मैदानावर रामायण वाचले जायचे. आज मतचोरीविरोधात आम्ही महाभारत सुरू केले. मोदी सरकार दो-नंबरी आहे आणि मोदीजी दस-नंबरी पंतप्रधान आहेत. आता मोदींनी देश किंवा ज्ञानेश कुमार यापैकी एक पर्याय निवडावा, असे आव्हान त्यांनी दिले.

जमीनच उरली नाही तर ‘अंगदचा पाय’ कुठे ठेवणार?

नवी दिल्ली : जे लोक ‘अंगदचा पाय’ असण्याच्या गोष्टी करतात, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की जेव्हा खाली जमीनच उरलेली नाही तर पाय कुठे ठेवणार? असा सवाल समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी केला. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काशीच्या जनतेने ‘डबल इंजिन’ सरकारला डबल भोपळा दिला. यूपीत १.२७ लाख हिंदू मते वगळली. प्रत्येक विधानसभेत ३१ हजार मते कमी झाली. आता स्वत:च्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका अखिलेश यादवांनी केली. जे लोक विश्वगुरू बनण्याच्या गप्पा मारत होते, तेच मतचोरी करत आहेत. जनता लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येत आहे आणि याची सुरुवात उत्तर प्रदेशातून होईल. पुढची पिढी प्रत्येक लाठीचा आणि दिलेल्या प्रत्येक जखमेचा बदला घेईल. भाजप स्वत:ला वाचवू शकणार नाही, असे अखिलेश म्हणाले.

Read About : Raj Thackeray Modi Adani documentary deleted- राज ठाकरेंकडून मोदी-अदाणींवरील डॉक्युमेंट्री डिलीट – 2026

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.