Ad Advertisement Ad Advertisement

Renapur road accident अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत दोन तरुण ठार ; एक गंभीर जखमी!

दुचाकीने जात होते शासकीय रुग्णालयात, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार

Renapur road accident रेणापूर : अज्ञात वाहनाने भरधाव वेगात दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार तर तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास रेणापूर-उदगिर मार्गावरील सेवादासनगर तांडा ते सेलू पाटी दरम्यान घडली. या अपघातात रुद्र लक्ष्मण तेलंगे (वय १७) आणि आदर्श बाळकृष्ण कोते (१७) (दोघे रा. धवेली, ता. रेणापूर) यांचा मृत्यू झाला, तर विठ्ठल प्रल्हाद पुंडकरे हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रुद्र तेलंगे याच्या जुन्या जखमेवरील पट्टी बदलण्यासाठी रुद्र, त्याचे मित्र आदर्श कोते आणि विठ्ठल पुंडकरे हे तिघे एमएच २४ बीक्यू ५२१७ क्रमांकाच्या दुचाकीवरून रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात आले होते. उपचारानंतर ते खरोळामार्गे गावाकडे परतत असताना सेवदास नगरतांडा ते सेलू पाटी दरम्यान समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, या अपघातात रुद्र तेलंगे आणि आदर्श कोते यांचा जागीच मृत्यू झाला, तर विठ्ठल पुंडकरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत रुद्र तेलंगे आणि आदर्श कोते यांचे सोमवारी दि २ नोव्हेंबर रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात श्वविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता धवेली येथील स्मशानभूमीत आत्यसंस्कार करण्यात आले. अपघानंतर वाहन चालक आपले वाहन घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी लक्ष्मण पांडुरंग तेलंगे (वय ३५, रा. धवेली) यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा क्रमांक ५३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक केंगले करीत आहेत.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; अपघातानंतर चालक फरार

येरमाळा : कळंब तालुक्यातील उपळाई पाटीजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात दि.२८ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला असून या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. या अपघातात उपळाई येथील जनार्दन मोहन हरभरे (वय ४८) यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत अथवा उपचारासाठी न नेता ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जनार्दन हरभरे हे मोटारसायकल क्र. एमएच २५ एएम ५४९४ वरून उपळाई पाटी येथून येरमाळाकडे जाणाऱ्या मार्गावर महामार्ग ओलांडण्यासाठी थांबले होते. यावेळी ट्रक क्र.एचआर ६९ जी ५४९५ च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत हरभरे गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळी न थांबता जखमीला उपचारासाठी मदत न करता तेथून पळ काढला. या अपघातात जनार्दन हरभरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत जनार्दन हरभरे यांचा मुलगा अभिजीत हरभरे (वय २५ रा. उपळाई, ता. कळंब, सध्या रा. लोहगाव, पुणे) यांनी दि.१ नोव्हेंबर रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read About : Three massive black holes – विश्वाच्या बालपणीची तीन कृष्णविवरे सापडली
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.