Ad Advertisement Ad Advertisement

AMNS India-VTS Group Customer Meet – एएमएनएस इंडिया-व्हीएसटी ग्रुपचा औद्योगिक ग्राहकांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर- AMNS India-VTS Group Customer Meet आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएमएनएस इंडिया) व व्हीटीएस ग्रुप यांच्यावतीने ग्राहक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात मराठवाड्यातील २५० औद्योगिक ग्राहकांनी सहभाग घेतला. स्टिल उपलब्धतता, औद्योगिक उत्पादनांच्या बदलत्या गरजा, पुरवठा साखळीतील आव्हाने व स्थानिक उद्योगांच्या विस्तारांच्या संधी यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला एएमएनएस इंडियाचे दिनेश पियुष, अभिषेक श्रीवास्तव, विकास छोतिया, व्हीटीएस ग्रुपचे सुमीत अग्रवाल उपस्थित होते.छत्रपती संभाजीनगर व परिसरातील ऑटोमोबाइल, वाहनाचे सुटे भाग, मूळ उपकरण उत्पादक, इलेक्ट्रिकल पॅनेल, प्री झ्र इंजिनिअर्ड बिल्डग्िंज व अभियांत्रिकी उद्योगांना दर्जेदार स्टिलचा नियमित पुरवठा करून दणे, ग्राहकांच्या विशिष्ट गरजांनुसार सेवा विकसित करणे या उपक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमात एएमएनएस इंडिया व व्हीएसटी ग्रुपच्या प्रतिनिधींनी स्टिल उत्पादनांची श्रेणी, उत्पादन क्षमता, गुणवत्ता, तंत्रज्ञानातील सुधारणा आणि ग्राहकाभिमुख पुरवठा व्यवस्थेची माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्याच्या दृष्टीने व्हीटीएस ग्रुपतर्फे हॉट रोल्ड, कोल्ड रोल्ड आणि गॅल्वनाइज्ड स्टिल उत्पादनांसाटी कट -टू -लेथ प्रक्रिया लाइन असलेले केंद्र उभारण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

व्हीटीएस ग्रुपचे सुमीत अग्रवाल यांनी ग्राहकांशी दीर्घकालीन विश्वासाचे संबंध निर्माण करणे व त्यांच्या व्यवसायवाढीत सहकारी भागीदार म्हणून योगदान देणे हे ग्रुपचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

Read About : EV Testing Facilities in Chhatrapati Sambhajinagar – ईव्ही उद्योगाच्या विकासासाठी छत्रपती संभाजीनगरात सामायिक चाचणी सुविधांची गरज
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.