तब्बल १३,६०० फूट उंचीवर उतरवले अजस्त्र विमान
नवी दिल्ली : Air Force Creates History – भारतीय वायूदलाने पूर्व लडाखमधील सामारिकदृष्टया अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या न्योमा वायुतळावर एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. वायूदलाचे रशियन बनावटीचे अवजड वाहतूक विमान ‘आयएल-७६’ने तब्बल १३,६०० फुटांपेक्षा अधिक उंचीवरील या एअरबेसवर यशस्वी लॅडिंग केली आहे. या विमानाचे जगातील हे आतापर्यंतचे सर्वात उंचीवरील लँडिंग ठरले आहे. यामुळे भारतीय वायुदलाच्या क्षमतेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पूर्व लडाखमधील न्योमा हवाईतळ हे चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (एलएसी)अवघ्या २५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे सामारिकदृष्टया महत्वपूर्ण असलेल्या या हवाई तळावरील ही लँडिंग महत्वपूर्ण मानली जात आहे. ही कामगिरी वैमानिकांचे असामान्य कौशल्य आणि अचूकता दर्शवणारी आहे. ‘आयएल-७६’ विमानाची जगातील कोणत्याही भागात केलेली ही सर्वोच्च उंचीवरील लँडिंग आहे. वायुदलाची क्षमता आणि सीमासुरक्षेला मोठे बळ देणारा हा एक महत्वाचा टप्पा आहे.
लष्करी हालचालींना अधिक बळकटी
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कार्यान्वित झालेले न्योमा हे लडाखमधील चौथे हवाई तळ आहे. तब्बल १३,६२९ फूट उंचीवर वसलेले हे हवाई तळ लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि मोठी वाहतूक विमाने हाताळण्यास सक्षम आहे. लडाखशिवाय लेह, कारगिल आणि थोइसमध्ये हवाई तळ कार्यान्वित आहेत. या ऐतिहासिक लँडिंगमुळे सीमारेषेवर सैन्याची रसद पोहोचवण्यास आणि लष्करी हालचालींना अधिक बळकटी मिळणार आहे.
Read About : ASC Tornadoes Set New World Record – धावत्या मोटारसायकलच्या सीटवर उभे राहून 154 किमीचा प्रवास
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.