Ad Advertisement Ad Advertisement

ASC Tornadoes Set New World Record – धावत्या मोटारसायकलच्या सीटवर उभे राहून 154 किमीचा प्रवास

लष्कराच्या ‘टॉर्नेडोज’चा नवा विश्वविक्रम

बंगळुरू : ASC Tornadoes Set New World Record एएससी टॉर्नेडोड म्हणून ओळखले जाणाऱ्या लष्कराच्या आर्मी सर्व्हिस कॉर्प्सच्या मोटारसायकल डिस्प्ले चमूने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. संघातील मेजर अमृत पंडा यांनी धावत्या मोटारसायकलच्या सीटवर सलग उभे राहून १५४ किलोमीटरचे अंतर पार करत एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. ‘मोटारसायकलच्या सीटवर उभे राहून सर्वात मोठा सलग प्रवास’ या श्रेणीत यापूर्वी १०७.९२ किलोमीटर प्रवासाचा विक्रम होता.

हा विक्रम मेजर पंडा यांनी मोडला. लष्कराच्या २६६ व्या कोर्प्स डे आणि १२ व्या रियुनियनच्या पार्श्वभूमीवर हा पराक्रम करण्यात आला असून, या नव्या कामगिरीसह ‘एएससी टॉर्नेडोज’च्या नावावर आता एकूण ३६ विश्वविक्रमांची नोंद झाली आहे. ‘ही कामगिरी शारीरिक सहनशक्ती, तांत्रिक कौशल्य आणि शिस्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन तर आहेच. शिवाय ही देशाच्या युद्धवीरांना दिलेली एक अनोखी आदरांजली आहे, असे लष्कराकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. ‘एएससी टॉर्नेडोज’ची स्थापना १९८२ मध्ये तत्कालीन मेजर सी. एन. राव यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. डिसेंबर १९८२ मधील आशियाई खेळांच्या उद्घाटन समारंभात या संघाने आपले पहिले सादरीकरण केले होते.

तेव्हापासून हा संघ रॉयल एनफिल्ड मोटारसायकलचा वापर करून अत्यंत कठीण आणि थरारक प्रात्यक्षिके सादर करत आला आहे. या संघाने प्रजासत्ताक दिन परेड, कारगिल विजय दिवस राईड, रेड डी हिमालय यांसह देशभरातील विविध मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे.

Read About : Nashik Godavari Aarti Guinness World Record- कुंभमेळा आस्था व सामाजिक समरसतेची परंपरा – राष्ट्रपती मुर्मू

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.