बीड जिल्ह्यातील घटना : जिनिंगवर कापसाची विक्री करून परतत होते घरी
Beed Road Accident आष्टी : शेतातील कापूस जिनिंगवर विक्री करून घरी परतत असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. शनिवारी (दि.७) झालेल्या या भीषण अपघातात दोन सख्य्या भावांसह नातीचा मृत्यू झाला. ही घटना आष्टी तालुक्यातील बाभळगाव (मिरजगाव- जि.अहिल्यानगर) येथे घडली. सुदाम मारुती पडोळे (५५), देविदास मारुती पडोळे (५५) आणि श्रेया विशाल पडोळे (१०) अशी मृतांची नावे असून ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
केळसांगवी (ता. आष्टी) येथील पडोळे कुटुंबातील वरील तिन्ही सदस्य कापूस विक्रीसाठी मिरजगावजवळील बाभळगाव येथील जिनिंगवर गेले होते. कापूस विक्री करून ते रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत होते. याचवेळी त्यांच्या दुचाकीची कारला जोरदार धडक बसली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, धडकेनंतर दुचाकी तब्बल ३०० फूट फरफटत गेली. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. शवविच्छेदन मिरजगाव येथे करण्यात आले. या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशीच एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने केळसांगवीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
आजोबा, मला दिवाळीला नवे कपडे घ्या ना!
आजोबा, मला दिवाळीला नवे कपडे आणि फटाके पाहिजेत… असा हट्ट नुकतेच वडिलांचे छत्र हरवलेल्या चिमुरड्या श्रेयाने धरला होता. शेतातील कापूस विकून मिळणाऱ्या पैशांतून नातीच्या हातावर नवीन कपडे ठेवण्याचा आनंद आजोबांना मिळणार होता. दिवाळीच्या सणासाठी नातीचे लाड पुरविण्याची स्वप्ने त्यांनी पाहिली होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Venugopal Dhoot Declared Bankrupt- व्हिडीओकॉनचे माजी प्रवर्तक वेणुगोपाल धूत दिवाळखोर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.