Ad Advertisement Ad Advertisement

Jayakwadi Left Canal Water Release – जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी अखेर सुटले; 300 क्युसेक विसर्ग

अंबड-घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

Jayakwadi Left Canal Water Release घनसावंगी : यंदा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांचे डोळे जायकवाडीच्या नाथ सागरातून कालव्यात कधी पाणी सुटते याकडे वेढले होते. अखेर रब्बी हंगाम २०२६-२७ साठी जायकवाडी प्रकल्पाच्या (नाथसागर) पैठण डाव्या कालव्यातून सोमवार (दि.९) पासून पाणी सोडण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून, रात्री ११ वाजेपर्यंत कालवा मुखाशी ३०० क्युसेक विसर्ग स्थिर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील रब्बी हंगामासाठी पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, पैठण यांच्या आदेशानुसार डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान पहिल्या टप्प्यात १०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आला. त्यानंतर रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान विसर्गात आणखी १०० क्युसेकने वाढ करून तो २०० क्युसेक करण्यात आला. तर रात्री १० ते ११ वाजेदरम्यान पुन्हा १०० क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला. रात्री ११ वाजेपर्यंत एकूण ३०० क्युसेक विसर्ग स्थिर करण्यात येणार आहे.

रात्री ११ वाजेपर्यंत नियोजित विसर्ग पूर्ण झाल्यानंतर पुढील आदेश मिळेपर्यंत कालवा मुखाशी ३०० क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना आवश्यक पाणी मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. विशेषत: अंबड व घनसावंगी तालुक्यातील कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या आवर्तनाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जायकवाडी कालवा समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत जायकवाडी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून ५ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू होत आहे.

टेल टू हेड पद्धतीने पाणीवाटपाला प्राध्यान्य

जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण डाव्या व उजव्या कालव्यांमधून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्याचा निर्णय जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला होता. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणीवाटप करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.तसेच जानेवारी महिन्यात धरणातील पाण्याच्या उपलब्धतेचा फेरआढावा घेऊन अतिरिक्त आवर्तनाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही जलसंपदामंर्त्यांनी स्पष्ट केले होते.

शेतकऱ्यांचे आवर्तनाकडे लक्ष

यंदाच्या रब्बी हंगामात पिकांना वेळेवर पाणी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जायकवाडीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू होत असल्याने अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत नियोजनानुसार पाणी पोहोचते का, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे

खडकपूर्णाचे पाणी विरेगावमध्ये दाखल, शहराचा पाणीप्रश्न निकाली

भोकरदन : भोकरदन शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दिलेला शब्द आज प्रत्यक्षात उतरला. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अहोरात्र घेतलेल्या कष्टांचे चीज होऊन अखेर खडकपूर्णा धरणाचे पाणी विरेगाव (ता. भोकरदन) येथील मुख्य पंप (पंपिंग स्टेशन) येथे दाखल झाले. सोमवारी (दि.९) आ. संतोष पा. दानवे यांच्या हस्ते या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. पूजन होताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत आनंदोत्सव साजरा केला. या ऐतिहासिक क्षणामुळे भोकरदनकरांची पाण्याची प्रतीक्षा संपली असून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरेगाव संपात पाणी पोहोचल्यामुळे आता शहराच्या मुख्य जलवाहिन्यांद्वारे प्रत्येक प्रभागात नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

Read About : Antarctica Glacier Melting : नासाच्या उपग्रह छायाचित्रांत दिसली कवटीसारखी रचना
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.