Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra River Linking Project – नदीजोड प्रकल्पाचे काम पुढील वर्षापासून होणार सुरू

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा संकल्प

मुंबई : Maharashtra River Linking Project यंदा राज्यात भीषण दुष्काळ आहे. शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्पाचे काम पुढील वर्षापासून सुरू होईल. हे काम आणखी ७ ते ८ वर्षे चालेल. एकदा नदीजोड प्रकल्प पूर्ण झाला की, महाराष्ट्र पूर्णपणे दुष्काळमुक्त झालेला दिसेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

‘वर्षा’ निवासस्थानी दिवाळीनिमित्त पत्रकारांना स्नेहभोजनासाठी मंगळवारी निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, सातारा, सांगलीतील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यास सुरुवात झाली आहे. कृष्णा खोऱ्यातून ३५ टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये सोडण्यात येईल. तिथून पाणी पुढे धाराशीव, बीड, लातूरपर्यंत जाईल. विदर्भातील काही भागांत पाऊस कमी पडतो. तिथपर्यंत देखील पाणी पोहोचवण्यात येणार आहे.

संकटे आली तरी, ती इष्टापत्ती समजून आपण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी काम करत आहोत, असे सांगून ते म्हणाले की, दिवाळीनिमित्त मी शेतकऱ्यांच्या घरी भेटी दिल्या. पण दुष्काळाच्या संकटातही त्यांचा ठामपणे उभे राहण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास पाहून मला आनंद वाटला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. अग्रीम मदत तर दिली आहेच, पण अंतिम मदतही लवकरच देऊ.

जलसंधारणाच्या कामावर भर

यावेळेला आपण जलसंधारणांच्या कामांवर भर दिला आहे. ‘व्हीबी जीराम जी’ ही केंद्राची योजना तसेच आपली ‘जलयुक्त शिवार’ योजना संयुक्तरीत्या राबवण्यात येत आहे. केंद्राने या योजनेसाठी ४ हजार कोटी रुपये दिले आहेत. गाळ काढणे, पुनर्भरण करणे ही कामे करण्यात येत असून या माध्यमातून जिल्हावार आराखडेही तयार करण्यास सांगण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले.

पुण्यात पाणीकपात

पुणेकरांचा पाण्याचा वापर गरजेच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. राज्यातील सर्व महानगरांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिव्यक्ती १५५ लिटर पाणी दिले जाते. त्या हिशोबाने पुणे शहराला ११ टीएमसी इतकेच पाणी देणे अपेक्षित आहे. मात्र पुणेकर दरवर्षी १६ टीएमसी पाणी वापरतात. त्यात अतिरिक्त वापर, गळतीसह इतरही कारणे असली तरी ११ टीएमसी एवढेच पाणी पुण्यानेही वापरायला हवे. आता पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता पुणे महापालिकेने आता कमी पाण्यात भागवण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे पाणीकपात लागू करावी लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले. सध्याच्या टंचाईच्या काळात पाणी वाया न जाऊ देता, योग्य पद्धतीने वापरले तर पुढील पावसाळ्यापर्यंत योग्य पद्धतीने पाणीपुरवठाही करणे शक्य होईल, असे फडणवीस म्हणाले.

Read About : Maharashtra borewell ban relaxed till December 15- बोअरवेल खोलीकरणावरील बंदी 15 डिसेंबरपर्यंत शिथिल

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.