Ad Advertisement Ad Advertisement

Shilpa Shetty Pyaar Ka Pressure Cooker – बिग बॉसची जागा घेणार शिल्पाचा नवा शो

‘प्यार का प्रेशर कुकर’मधून नात्यांची परीक्षा, जोडप्यांसोबत आई-वडीलही होणार सहभागी

मुंबई : Shilpa Shetty Pyaar Ka Pressure Cooker – छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीची जादू पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री शिल्पा आता ‘प्यार का प्रेशर कुकर’ या नव्या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे. प्रेम, लग्न आणि नात्यांमधील गुंतागुंत उलगडणारा हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार असून, जिओहॉटस्टारवरही पाहता येईल. विशेष म्हणजे, ‘बिग बॉस’चा सध्याचा वेळ या नव्या शोला मिळणार असल्याची माहिती आहे.

नात्यांमधील प्रश्नांची उकल

या कार्यक्रमात काही जोडपी एकाच छताखाली राहणार आहेत. नात्यांमधील मतभेद, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, कमिटमेंट आणि लग्नाचा निर्णय अशा अनेक विषयांवर त्यांच्यात चर्चा होईल. आजच्या तरुणाईमध्ये नात्यांबाबत असलेला संभ्रम आणि बदलत्या नातेसंबंधांचे स्वरूप या शोमधून समोर येणार आहे.

आई-वडिलांचाही सहभाग

या शोचे वेगळेपण म्हणजे सहभागी जोडप्यांसोबत त्यांच्या आई-वडिलांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. ‘जोडो या तोडो’ आणि ‘क्लॅरिटी की सीटी’ या विशेष भागांमधून पालक आपली मते मांडतील. त्यामुळे जोडप्यांच्या नात्यांकडे कुटुंबाच्या दृष्टिकोनातूनही पाहण्याची संधी मिळणार आहे.

नात्यांमधील बदलांवर शिल्पाचे भाष्य

शोबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली की, आजच्या नात्यांमध्ये ‘सिच्युएशनशिप’, ‘बे्रडक्रंबिंग’ आणि ‘बेंचिंग’ यांसारख्या नव्या संकल्पना आल्या आहेत. त्यामुळे नात्यांमध्ये स्पष्टता कमी होत चालली आहे. या कार्यक्रमाची संकल्पना वेगळी आणि आजच्या काळाशी जोडलेली असल्याने आपण या शोसाठी उत्सुक असल्याचेही तिने सांगितले.

यंदाचा दुसरा सूत्रसंचालनाचा कार्यक्रम

‘प्यार का प्रेशर कुकर’ हा यंदाच्या वर्षातील शिल्पाचा दुसरा सूत्रसंचालनाचा कार्यक्रम आहे. याआधी ती ‘माँ है ना’ या शोमध्ये दिसली होती. याशिवाय ‘सुपर डान्सर’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये तिने परीक्षकाची भूमिका बजावली आहे.

या नव्या शोच्या प्रक्षेपणाची तारीख आणि सहभागी जोडप्यांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. मात्र, प्रेमाच्या नात्यांमधील प्रश्न, पालकांचा हस्तक्षेप आणि लग्नाचे निर्णय यामुळे हा शो किती रंगतदार ठरणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Read About: Jayanta Mukherjee Death – अभिनेत्री मौसमी चॅटर्जीचे पती जयंत मुखर्जी यांचे निधन

E-Paper: Punyanagari E-Paper‘

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.