Ad Advertisement Ad Advertisement

Kaziranga Road Accident – काझीरंगा येथे भीषण अपघात; 23 जणांचा मृत्यू

मिनी बस आणि कंटेनर ट्रकच्या समोरासमोर धडक, अनेक गंभीर जखमी

गुवाहाटी : Kaziranga Road Accident – आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी (दि. १३) एक मिनी बस आणि कंटेनर ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत २३ ठार तर अनेक जण जखमी झाले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृति गंभीर असल्याने मृत्यूसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हा अपघात कोहोरा रेंजमधील नॅशनल हायवे-७१५ वर, हाथीकुली चहा बागेजवळील रंगाजन परिसरात झाला. नागावकडे जाणाऱ्या मिनी बसची जोरहाटकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रकशी समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, मिनी बसच्या एका बाजूचा चेंदामेंदा होऊन अनेक प्रवासी आत अडकून पडले. पोलिसांसोबत स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले.

बसमध्ये ३५ प्रवासी

बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना प्रथम कोहोरा मॉडेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी जोरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पाठवण्यात आले. गोलाघाटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक स्वप्नील डेका यांनी सांगितले की, पोलिस दल घटनास्थळी असून, बसमधून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बसचा वेग जास्त असल्याचा आणि चालकाने नियंत्रण गमावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सरकारची मदत

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना लवकर चांगले वैद्यकीय उपचार मिळावे, याला सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक आमदार आणि मंत्री अतुल बोरा यांनी अपघातस्थळी जाऊन मदत व बचाव कार्यावर लक्ष ठेवले. बचाव कार्य अद्याप सुरू असल्याने मृतांची अचूक संख्या आणि जखमींची स्थिती यावर लक्ष ठेवले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read About : Ashti truck accident – 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या ट्रकने घेतला पेट; चालकाचा दुर्देवी अंत E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.