कंटेनर उलटल्याने थांबलेल्या वाहनांना भरधाव ट्रकची धडक
बुलढाणा – Samruddhi Mahamarg Accident बुलढाणा जिल्हयातील दुसरबीडजवळ समृद्ध महामार्गावरील भीषण अपघतात १९ वाहने अपघातग्रस्त झाली. या अपघतात तेरा प्रवासी जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्हयातील दुसरबीडजवळ तढेगाव परिसरात मुंबई कॉरिडोरवर चॅनल क्रमांक ३२१.९०० नजीक १३ नोव्हेंबरच्या सकाळी पावणेसातच्या सुमारास सिमेंट भरलेला एमएच-४६-डीसी-०५१९ क्रमांकाचा कंटेनर पुलावर उसळी मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटून उलटला. यामुळे तिन्ही लेन बंद झाल्या. याची माहिती समजताच महामार्ग पोलिसांनी तातडीने वाहतूक थांबवली. महामार्गाच्या सर्व्हिस लाइनसह १२० च्या लेनवर आडवा झाल्याने रस्ता ब्लॉक झाला. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, ११ वाजून २० मिनिटांनी एमएच-४०-बीएल-४९११ क्रमांकाच्या भरधाव वेगातील ट्रकने उभ्या कारना धडक दिली. त्यामुळे समोरील उभी वाहने जोरात एकमेकांवर आदळली. काही वाहने तर वाहनांवर चढली. या अपघातात १९ कारचे प्रचंड नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात मोठा कालावधी गेला. यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सर्व अपघातग्रस्त वाहने सिंदखेड राजा येथील टोलनाक्यावर लावण्यात आली आहेत. तर धडक देणारा आधीचा अपघातग्रस्त कंटेनर आणि एमएच-४०-बीएल-४९११ क्रमांकाचा ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. तब्बल दोन तास वाहनधारकांना ताटकळत बसावे लागले.
समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वाहनांच्या वेगमर्यादेचा आणि सुरक्षित अंतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अत्याधुनिक सुविधा असलेल्या महामार्गावरही चालकांचा निष्काळजीपण, अतिवेग आणि सुरक्षेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष किती घातक ठरू शकते.
दीपावलीनंतर आनंदात परत निघाले, पण…
मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या भागात नोकरी, व्यवसायानिमित्त राहणारे अनेक कुटुंबीय दीपावली आणि भाऊबीजच्या सणानिमित्त विदर्भात आपापल्या घरी आले होते. दीपोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा केल्यानंतर आपापल्या वाहनांनी परतीच्या मार्गावर लागले. मात्र, बुलढाणा जल्ह्यिातून जाताना ही दुर्घटना घडली.
चालक फरार
अपघातग्रस्त कंटेनरला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी वाहने थांबवली. तोपर्यंत पन्नासहून अधिक वाहनांची रांग लागली. त्यानंतर भरधाव ट्रकने अनेक कारला धडक दिली. अपघात घडताच चालक घटनास्थळावरून फरार झाला.
जखमींची नावे
या अपघातात सरला गजानन कंकाळ (वय ४२) रा. अकोला) यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. प्रथम पुट्टी (वय ८) रा. ठाणे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच आराध्या मनीष काकडे, मनीषा मनीष काकडे रा. पुणे, कृष्णा कपिल गौतम रा. अकोला, रिता अशोक मश्रिा, मयंक अशोक मश्रिा रा. पुणे, स्वप्निल बाबाराव पांडव रा. पुणे, शुभम साळवे रा. अकोला हे किरकोळ जखमी झाले. जखमींवर सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच गजानन कंकाळ, अंशुल अग्रवाल, शिवांश अग्रवाल, शिवानी अग्रवाल, देवेश झाडे, प्रियंका झाडे व इतर काही जण किरकोळ जखमी झाले. मात्र, त्यांची नावे समजू शकली नाही.
चक्काचूर झालेल्या कारचे क्रमांक
एमएच-०३-डीयू-६४८८, एमएच-४८-एसी-४४१६, एमएच-३१-एफई-०८७६, एमएच-१४-केएस-३१३१, एमएच-२५-बीएच-११५८, एमएच-३१-आरए-२९३२, एमएच-३१-जीडी-०६५३, एमएच-१४-एलए-२९०३, एमएच-३०-सीबी-२१५५, एमएच-१४-ईवाय-०५३७, एमएच-एचयू-९६४८, एमएच-३०-एझेड-९६३९, एमएच-१४-केजे-५९२४, एमएच-१२-व्हीझेड-५४९४, जीजे-१६-एफबी-२८९४, एमएच-०२-सीबी-३३६३, एमएच-३०-बीबी-६६४६, एमएच-४९-एई-३८०८, एमएच-२८-सीसी-६८३०.
Read About : Madhya Pradesh Blast – रसगुल्ला समजून गावठी बॉम्ब तोंडात टाकला; 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.