Ad Advertisement Ad Advertisement

Madhya Pradesh Blast – रसगुल्ला समजून गावठी बॉम्ब तोंडात टाकला; 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू

बॉम्ब चावताच तोंडात झाला भीषण स्फोट; रुग्णालयात मृत घोषित

दिंडोरी (मध्य प्रदेश) : Madhya Pradesh Blast रसगुल्ला समजून तोंडात टाकलेला गावठी बॉम्ब फुटल्याने ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात घडली आहे. राजेंद्र बरौतिया असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

रात्रीच्या सुमारास छांटा गावात दिवाळी साजरी होत असताना राजेंद्र इतर गावकऱ्यांसोबत शेकोटीजवळ बसला होता. यावेळी त्याचा मित्र राम भगत याने गप्पा आणि थट्टामस्करीच्या नादात रसगुल्ल्यासारखा दिसणारा एक गावठी बॉम्ब राजेंद्रच्या तोंडात घातला. राजेंद्रने तो पदार्थ चावताच तोंडातच भीषण स्फोट झाला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने दिंडोरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

काय असतो हा गावठी बॉम्ब?

या भागातील काही ग्रामीण आणि आदिवासी भागांत रानडुकरांची शिकार करण्यासाठी अशा प्रकारच्या गावठी स्फोटकांचा वापर केला जातो. पिठाच्या गोळ्यांमध्ये फटाके किंवा खाणीतून मिळवलेली दारू (गंपावडर) भरून हे बॉम्ब तयार केले जातात, जे दिसायला हुबेहूब गोड पदार्थांसारखे किंवा रसगुल्ल्यासारखे दिसतात.

पोलीस कारवाई आणि तपास

हे कृत्य केवळ थट्टामस्करीतून घडले की राजेंद्रच्या हत्येच्या उद्देशाने केले गेले, याचा पोलीस तपास करत आहेत. दिंडोरी कोतवाली पोलिसांनी आरोपी राम भगत बरौतिया याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ (सदोष मनुष्यवध) आणि स्फोटक कायद्याच्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Read About : Samruddhi Expressway Accident – समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने 22 हून अधिक वाहनांना दिली धडक, अनेक जण जखमी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.