Ad Advertisement Ad Advertisement

Tribal Development Schemes Home Delivery Sanjay Shirsat – विकास योजनांचा लाभ आदिवासींना घरपोच द्यावा दि.15 -पालकमंत्री संजय शिरसाट

जनजातीय गौरव दिन समारंभ

छत्रपती संभाजीनगर – Tribal Development Schemes Home Delivery Sanjay Shirsat – शासनामार्फत आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र दुर्गम भागात वास्तव्य आणि कमी जागृती असलेल्या समाजापर्यंत योजनांचा लाभ आता आदिवासी विकास विभागाने घरपोच द्यावा,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी (दि.15) केले.

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम जनजातीय गौरव दिन समारंभाचे आयोजन बीड बायपास येथील अंबिका लॉन्स येथे करण्यात आले होते. पालकमंत्री संजय शिरसाट, विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाट, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, आदिवासी विकास विभागाच्या अमरावती विभागीय प्रादेशिक उपायुक्त शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, सहा. प्रकल्प अधिकारी बाणेश्वर भगत, डॉ. उद्धव वायाळ, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवन सोनवणे, दीपक पवार आदिवासी संशोधक कडुदास कांबळे, कलावंत विद्यार्थिनी भारती गांगुर्डे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते आदिवासी नायकांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आदिवासी समाज हा तुलनेने कमी शिक्षित आहे. तो दुर्गम भागात राहतो. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी शासनाने केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने आता स्वत:हून आदिवासींच्या घरापर्यंत जाऊन योजनांचा लाभ दिला पाहिजे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचे साहस आणि धैर्य याचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. आदिवासी समाजाचा मुंबई येथे येत्या फेब्रुवारी महिन्यात मेळावा घेण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजातील मुला-मुलींनी शिक्षणाचा ध्यास घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन प्रगती साधावी. सर्वच क्षेत्र त्यांच्यासाठी खुले आहेत,असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासींच्या संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांचे रुप साकारलेल्या नवसुख कोळसे व कलावंत विद्यार्थिनी भारती गांगुर्डे यांच्या सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास विविध आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी, आदिवासी समाजातील महिला-पुरुष उपस्थित होते.या सप्ताहात दि.१६ रोजी शिरुर कासार यथे आधार कार्ड व इतर आवश्यक शासकीय कागदपत्रांचे सेवा शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि.१७ सिल्लोड येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेळावा, आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हाधिकारी जालना, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित राहतील.दि.१८ रोजी प्रकल्प कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे जनजागृती सप्ताहाचा अधिकृत समारोप होईल.

Read About : Ghati Hospital Doctors – फुफ्फुसात अडकलेली सीताफळाची बी बाहेर काढून बालकाला दिले जीवदान
E-Paper: Punyanagari E-Paper

महत्त्वाचे मुद्दे

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.