Ad Advertisement Ad Advertisement

Gajanan Mehendale Book Publication – गजानन मेहेंदळे यांच्या पुस्तकांचा उद्या प्रकाशन

साहित्य भारती आणि श्री शिवशंभू विचार मंचच्या वतीने हा कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर :Gajanan Mehendale Book Publication दिवंगत इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे लिखित भारतातील इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण उत्तरकालीन मुघल आणि औरंगजेब आणि प्रा. डॉ. केदार फाळके यांच्या श्री शिवछत्रपती भारत भाग्यविधाता या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी (दि. १७) आयोजित करण्यात आला आहे. साहित्य भारती आणि श्री शिवशंभू विचार मंचच्या वतीने हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्­हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अभ्यासक प्रा. डॉ. दिनेश कचकुरे तर प्रमुख वक्­ते म्­हणून प्रा. डॉ. केदार फाळके उपस्­थित राहतील. श्री शिवशंभू विचार मंचचे महाराष्ट्र राज्य संयोजक गोरक्षनाथ आबूज, बीड आणि साहित्­य भारतीचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. सर्जेराव जिगे यांची यावेळी प्रमुख उपस्­थिती राहणार आहे.

मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजता जीवन विकास ग्रंथालय सभागृहात होर्णा­या या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्­थित राहण्याचे आवाहन साहित्­य भारतीचे जिल्­हाध्यक्ष प्रा. डॉ. विजय पोहनेरकर आणि शिवशंभू विचार मंचचे संयोजक धीरज कांबळे यांनी केले आहे.

Read About :  justice-ravindra-ghuge-felicitation-aurangabad-high-court – औरंगाबादसह येथील हायकोर्ट माझी कर्मभूमी ; हार्डवर्क इथेच शिकलो त्याशिवाय पर्याय नाहीच
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.