५० रुग्णांवर अभ्यास : डॉक्टरांकडून तपासणी गरजेचीच
न्यूयॉर्क : AI Medical Diagnosis Errors – रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, तपासण्या आणि लक्षणे अशी संपूर्ण माहिती दल्यिानंतरही एआयची (कृत्रिम बुद्धिमत्तेची) ३६ टक्के निदाने चुकली. म्हणजे साधारण दर तीन निदानांपैकी एक चुकले. त्यामुळे एआय वापरताना डॉक्टरांची तपासणी आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ‘एआय’ला दहा रुग्णालयांतील ५० रुग्णांची वैद्यकीय माहिती पुरवण्यिात आली होती.
या अभ्यासात सात भाषा-मॉडेल्स तपासण्यात आली. भाषा-मॉडेल म्हणजे प्रश्न विचारला की माणसासारखे लिहून उत्तर देणारे एआय. त्यांना रुग्णांचा इतिहास, तपासण्या आणि लक्षणे अशी सगळी माहिती देण्यात आली होती. एवढी माहिती हातात असूनही त्याची काही निदाने चुकली. याचा सरळ अर्थ असा की एआय अजून डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही. मात्र डॉक्टरांचा मदतनीस म्हणून ते नक्की उपयोगी पडू शकते.
रुग्णाचा इतिहास, रक्त तपासण्या, स्कॅन अहवाल आणि लक्षणे दिली तर एआय कोणता आजार असू शकतो याचे पर्याय सुचवू शकते. यामुळे डॉक्टरांना विचार करायला एक जास्तीचा आधार मिळतो. पण अडचण अशी की जर एआयला दिलेली माहिती चुकीची किंवा अपुरी असेल तर निदान चुकते. चुकीच्या निदानावर उपचार सुरू झाले तर रुग्णाला त्रास होऊ शकतो.
एआयला तूर्त अनेक मर्यादा
नवीन रोग, दुर्मिळ आजार किंवा नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे एआयला ओळखता येत नाहीत. अशा वेळी रुग्णाला प्रत्यक्ष पाहणाऱ्या डॉक्टरांचा अनुभवच कामी येतो. म्हणूनच डॉक्टर केवळ कागदावरची माहिती पाहत नाहीत. ते रुग्णाशी बोलतात, त्याला तपासतात आणि मगच नर्णिय घेतात. ही गोष्ट एआयला अजून जमत नाही. त्यामुळे एआयचे उत्तर कितीही नीटनेटके वाटले तरी ते डॉक्टरांनी तपासायलाच हवे.
एआय म्हणाले म्हणजे खरेच असे नाही
सामान्य माणसानेही यातून एक गोष्ट लक्षात ठेवावी. ‘एआय म्हणाले म्हणजे खरेच’ असे मानू नये. एआयचे उत्तर एक संदर्भ म्हणून घ्यावे आणि ते डॉक्टरांना दाखवून खात्री करून घ्यावी. आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि त्याचा फायदाही होत आहे. पण त्याबरोबरच त्याची अचूकता, सुरक्षितता आणि मर्यादा यांकडेही तितकेच लक्ष द्यावे लागेल, हे या अभ्यासातून स्पष्ट झाले.
Read About : Type 1 Diabetes Awareness – टाइप 1 मधुमेह जनजागृतीसाठी 460 शाळांमध्ये उपक्रम E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.