Ad Advertisement Ad Advertisement

Health University Winter Exams – आरोग्य विद्यापीठाच्या 28 नोव्हेंबरपासून परीक्षा

पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा | राज्यातील १८५ केंद्रांवर होणार परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : Health University Winter Exams – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी-२०२६ टप्पा – १ मधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेला २८ नोव्हेंबर २०२६ पासून प्रारंभ होणार आहे. या लेखी परीक्षांचे संचलन विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्यंकट गीते यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा होईल. २८ नोव्हेंबर २०२६ ते ०१ जानेवारी २०२७ कालावधीत एकूण १८५ परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

सदर परीक्षेसाठी उक्त अभ्यासक्रमांचे एकूण ८३, ११७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. हिवाळी – २०२४ ते उन्हाळी – २०२६ टप्पा-१ ते ४ मधील विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाने ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर पेपर सुरु होण्याआधी पाठवलेल्या आहेत. तसेच उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करुन ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे तपासण्याचे कार्यही यशस्वीरीत्या केलेले आहे.

याचप्रमाणे एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यू.एम.एस., बी.पी.टी.एच., बी.एच.एम.एस. इ. या पदवी तसेच वैद्यकीय, आयुर्वेद इत्यादी विद्याशाखेच्या पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या हिवाळी -२०२६ टप्पा-१ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली. उपरोक्त अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर एक तास अगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी ९ वाजता व दुपार सत्रासाठी दुपारी १ वाजता परीक्षाकेंद्रावर रिपोर्ट करावे लागणार आहे.

Read About : National Newborn Week 2026 – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहाला उत्साहात सुरुवात
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.