सॅन फ्रान्सिस्को येथे पॅक्स सिलिका उपक्रमांतर्गत घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या; भारत, अमेरिका, ब्रिटन, जपानसह दहा देशांचा सहभाग
वाशिंग्टन : San Francisco AI Supply Chain Declaration उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनसोबत वाढती स्पर्धा पाहता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पुरवठा साखळीच्या सुरक्षेला सामायिक प्रयत्न म्हणून मानण्यासाठी भारत, अमेरिका आणि इतर आठ देशांनी सॅन फ्रान्सिस्को घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दहा देशांची ही वज्रमूठ एआय भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर भामट्यांना ‘दहाचा पंच’ नक्कीच देईल, असे मानले जाते.
आगामी ‘क्वाड’ शिखर परिषदेपूर्वी अमेरिकेचे आर्थिक विषयावरील अवर परराष्ट्र मंत्री जेकब हेलबर्ग यांनी रविवारी आयोजित केलेल्या अमेरिका-नेतृत्वाखालील ‘पॅक्स सिलिका’ उपक्रमाच्या संस्थापक राष्ट्रांच्या बैठकीत या सॅन फ्रान्सिस्को घोषणापत्रावरस्वाक्षरी करण्यात आली.
भारत आणि अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया, कतार, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ब्रिटन या देशांनी या घोषणापत्रावर सहमती दर्शवली आहे.
काय आहे पॅक्स सिलिका उपक्रम?
सेमीकंडक्टर उत्पादनासाठी आवश्यक असलेले सिलिकॉन आणि इतर खनिजांची पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेद्वारे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘पॅक्स सिलिका’ उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत तंत्रज्ञान उद्योगांना बळ दिले जाते.
घोषणापत्रातील प्रमुख तरतुदी
- आर्थिक सुरक्षा हीच राष्ट्रीय सुरक्षा : आर्थिक सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा पाया आहे, या तत्त्वावर घोषणापत्र आधारित आहे. कोणताही एक देश स्वतंत्रपणे सुपर इंटेलिजन्स युगाची सुरक्षित पायाभरणी करू शकत नाही. त्यामुळे विश्वासार्ह आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी निर्माण करून सामूहिक लवचिकता वाढवणे गरजेचे असल्याचे या घोषणापत्रात म्हटले आहे.
- संवेदनशील तंत्रज्ञान : ज्यामध्ये सॉफ्टवेअर, साहित्य, उत्पादन घटक आणि तांत्रिक ज्ञान यांचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान शत्रू राष्ट्रांकडे गेल्यास राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
- महत्त्वाच्या पायाभूत सुविधा : बंदरे, वाहतूक जाळे, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी), ऊर्जा नेटवर्क आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा यात समावेश असून, यातील डेटा चोरीला गेल्यास अत्यावश्यक सेवा कोलमडू शकतात.
पाच कार्यगट स्थापन करण्याचा प्रस्ताव
सामायिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी पाच कार्यगट स्थापन करण्याचा प्रस्ताव यात मांडण्यात आला आहे. यामध्ये नावीन्यपूर्ण धोरणे, प्रमुख क्षेत्रांमध्ये एआयचा वापर, पुरवठा साखळी सहकार्य आणि सुरक्षा यांसारख्या विषयांचा समावेश आहे.
‘एआय’ नव्हे ‘एसआय’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रोन यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर अमेरिकेत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ला (एआय) ‘सुपर इंटेलिजन्स’ (एसआय) म्हणून संबोधले जात आहे.
Read About : Animals Sixth Sense : पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वेध घेणारे प्राण्यांचे सहावे इंद्रिय; मानवासाठी मात्र हे गूढ अद्याप कायम
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.