Ad Advertisement Ad Advertisement

Assam New Sedge Moth Species 2026: आसाममध्ये शतकानंतर नव्या सेड्ज मॉथ प्रजातीचा शोध

जोरहाट जिल्ह्यातील होलोंगापार गिबन अभयारण्याजवळ संशोधकांना नवी प्रजाती आढळली

गुवाहाटी : Assam New Sedge Moth Species अवघ्या ६.५ मिलिमीटर पंखांचा विस्तार असलेल्या एका सूक्ष्म पतंगाने (सेड्ज मॉथ) आसामच्या नावावर एका दुर्मिळ वैज्ञानिक कामगिरीची नोंद केली आहे. संशोधकांनी जोरहाट जिल्ह्यातील मारियानी येथील होलोंगापार गिबन अभयारण्याजवळ या नव्या प्रजातीचा शोध लावला असून, भारतातील सेड्ज मॉथ कुटुंबात तब्बल एक शतकानंतर समाविष्ट झालेली ही पहिलीच नवी प्रजाती आहे.

आयसीएआर-भारतीय कृषी संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ किशोर चंद्र साहू आणि अभिजीत के. पी. यांनी २ ऑक्टोबर २०२५ रोजी या कीटकाचा नमुना संकलित केला होता. या प्रजातीला ग्लायफिप्टेरिक्स ब्रेविमुक्रोनाटा नाव देण्यात आले आहे. तपकिरी पंखांवर पिवळी धातूची चमक आणि पांढरे ठिपके हे याचे वैशिष्ट्य आहे. जगभरात या कुटुंबातील ५३० हून अधिक प्रजाती असल्या तरी भारतात केवळ २५ प्रजातींचीच नोंद होती. १९०७ ते १९२३ या काळात ब्रिटिश शास्त्रज्ञ एडवर्ड मेरिक यांनी केलेल्या संशोधनानंतरचा हा पहिलाच मोठा शोध आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी एक्सवरून या शोधाचे स्वागत केले. आसामच्या निसर्गात अजूनही अशी अनेक रंजक रहस्ये दडलेली आहेत, ज्यांचा शोध लागणे अद्याप बाकी आहे असे त्यांनी नमूद केले. केवळ २०.९८ चौरस किलोमीटरवर पसरलेले होलोंगापार अभयारण्य भारतातील एकमेव वानर प्रजाती हूलॉक गिबनसाठी प्रसिद्ध आहे.

Read About : Rain Water Harvesting – सर्व इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य
E-Paper : Punyanagari E-Paperपर्यावरण

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.