‘कंपनी आणि अमेरिकेच्या हितासाठी हुआंग यांचे पुनरागमन योग्य ठरेल’, ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवर पोस्ट; एनव्हिडियाचे अंतरिम नेतृत्व कोलेट क्रेस यांच्याकडे
नवी दिल्ली : Jensen Huang Nvidia Return जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनी असलेल्या एनव्हिडियाने जेन्सन हुआंग यांना दुसरी संधी द्यावी, ते कंपनीसाठी चांगले ठरेल, अशी इच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी सोमवारी ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये आपली ही इच्छा व्यक्त केली. त्यांनी लिहिले, ”मला आशा आहे की एनव्हिडियाचे संचालक मंडळ जेन्सन हुआंग यांना पुन्हा कामावर घेईल. हे कंपनी आणि देशासाठी सर्वोत्तम ठरेल.”
चिनी व्यावसायिक महिला ॲलिस हुआंग यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांच्या वृत्तांदरम्यान, जेन्सन हुआंग यांनी १२ नोव्हेंबर रोजी एनव्हिडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी त्यांनी आपली चूक कबूल करून आपली पत्नी व मुलांची माफी मागितली होती.
ट्रम्प यांनी यापूर्वीही हुआंग यांची बाजू उचलून धरली आहे. त्यांची ही ताजी पोस्ट अमेरिकेचे अथमंत्री स्कॉट बेेसेंट यांच्या टीव्ही मुलाखतीनंतर आली आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की निर्यात-नियंत्रण नियमांचे पालन करण्यातील संभाव्य त्रुटींबद्दल प्रशासन अजूनही एनव्हिडियाकडून उत्तरांची वाट पाहत आहे.
बेसेंट काय म्हणाले?
सीबीएसच्या ‘फेस द नेशन’ या कार्यक्रमात बोलताना, बेसेंट म्हणाले की, काय घडले आणि यासाठी कोण जबाबदार आहे हे निश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एनव्हिडियाचे अंतरिम व्यवस्थापन, प्रमुख संचालक आणि वकिलांशी संपर्क साधला आहे. प्रशासनाला आवश्यक उत्तरे मिळाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेच्या प्रगत चिप्स चीनमध्ये कशा पोहोचल्या याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शपथपूर्वक साक्ष द्यावी, अशी मागणी एका रिपब्लिकन सिनेटरने केली आहे.
एलिस आणि त्यांची कंपनी, मेगास्पीड, यांची चौकशी सुरू आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक जे. क्लेटन यांनी आधीच स्पष्ट केले आहे. हुआंग १ डिसेंबर रोजी अमेरिकेच्या काँग्रेसच्या तीन समित्यांसमोर एका बंद खोलीतील सुनावणीसाठी हजर होतील.
ॲलिस हुआंग चिनी गुप्तहेरांच्या संपर्कात
जेन्सेन यांचे प्रेमप्रकरण उघडकीस आलेली संशयित चिनी महिला हेर ॲलिस हुआंग गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून चीनच्या सर्वोच्च गुप्तचर संस्थेच्या एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होती, असा दावा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने स्थानिक वेळेनुसार रविवारी अमेरिकेच्या गुप्तचर अहवालांची माहिती असलेल्या अनेक व्यक्तींच्या हवाल्याने केला आहे.
ॲलिस हुआंग साधारण मार्च २०२५ या वर्षाच्या शरद ऋतूपर्यंत चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालय या गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होती, अमेरिकी गुप्तचर संस्थांना असे पुरावे मिळाले आहेत की, ॲलिस हुआंगचा व्यावसायिक भागीदार कांग वेई — ज्याची ओळख अनेकदा तिचा पती म्हणून करून दिली जात असे — तो देखील त्याच चिनी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होता, असा दावाही टाईम्सने केला आहे.
Read About: San Francisco AI Supply Chain Declaration : भारत-अमेरिकेसह 10 देशांची एआय सुरक्षेसाठी एकजूट; चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.