Ad Advertisement Ad Advertisement

Employability-oriented courses – अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम आता ‘संत रोहिदास’ नावाने ओळखला जाणार; मंत्री लोढांची माहिती

अभ्यासक्रमांच्या कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

मुंबई : Employability-oriented courses – औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणारा अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम आता ‘संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या नावाने ओळखला जाणार आहे. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांच्या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.

कामासोबत प्रशिक्षण घेण्याची सुविधा

पदवी शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास आणि कौशल्यवृद्धी आवश्यक असून, त्यातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण किंवा कामासोबत प्रशिक्षण घेता यावे, यासाठी दोन, तीन किंवा चार तासांचे प्रमाणित कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे लोढा म्हणाले.

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम

पारंपरिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश कार्यक्रमात करण्यात आला आहे. ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि सेमीकंडक्टर यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे युवकांना उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पहिल्या टप्प्यात 1,766 प्रशिक्षण तुकड्या

या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 414 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 122 शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रांचा समावेश करण्यात आला. एकूण 1,766 प्रशिक्षण तुकड्या सुरू करण्यात आल्या असून, त्यामध्ये 51,042 प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला. यापैकी 37,981 प्रशिक्षणार्थींचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यात 1,844 प्रशिक्षणार्थीं

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी जिल्हा नियोजन निधीचा वापर करण्यात आला. या टप्प्यात एकूण 88 प्रशिक्षण तुकड्यांना मंजुरी देण्यात आली असून, 1,844 प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे. त्यापैकी 59 प्रशिक्षण तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यात 18,266 प्रशिक्षणार्थींचा प्रवेश

कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 56 शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रांमधील 67 प्रशिक्षण तुकड्या आणि 346 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील 817 प्रशिक्षण तुकड्या अशा एकूण 884 प्रशिक्षण तुकड्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या टप्प्यासाठी 26,520 प्रशिक्षण प्रवेश क्षमता उपलब्ध असून, त्यापैकी 18,266 प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दक्ष निधीतून तरतूद करण्यात येणार आहे. अध्यापकवर्ग आणि बाह्य तज्ज्ञांच्या सहभागातून असे अल्पमुदतीचे कार्यक्रम सातत्याने राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

महिलांसाठी विशेष अभ्यासक्रम

महिलांच्या कौशल्य विकासासाठीही या कार्यक्रमांतर्गत विशेष अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात 260 प्रशिक्षण तुकड्यांच्या माध्यमातून 7,234 महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये सेमीकंडक्टर टेक्निशियन, ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि ब्युटी थेरपिस्ट यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

Read About : Census 2027 – राज्यात जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होणार जानेवारीपासून; आधी स्वयंगणना आणि नंतर घरोघरी गणना

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.