Ad Advertisement Ad Advertisement

नेते असोत की कार्यकर्ते…जनतेत दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही – Illegal Hoardings in Maharashtra

मुख्यमंत्री फडणवीस यांनी टोचले कान : शहर विद्रूप न करण्याची खबरदारी घेण्याचा दिला सल्ला

छत्रपती संभाजीनगर : Illegal Hoardings in Maharashtra : शहरात ठिकठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज, बॅनर लाऊन शहराच्या विद्रूपिकरणात मोलाचा हातभार लावणाऱ्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत कान टोचले आहेत. शहर विदू्रप होणार नाही, याची खबरदारी घ्या, नेते असोत की कार्यकर्ते ते कायम जनतेत दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही, अशा शब्दांत बॅनरबाज कार्यकर्त्यांना सुनावले आहे. शुक्रवारी (दि.२७) मुख्यमंत्र्यांचे ट्विट येताच त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

एखादा कार्यक्रम असो, मंत्री-नेत्याचे शहरात आगमन, किंवा वाढदिवस असो….नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बॅनर, होर्डिंग्ज लावण्याची स्पर्धाच लागते. दिवाळीपूर्वी शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त शहानूरमियॉदर्गा, सिडको उड्डाणपुलावरील पथदिव्यांच्या खांबांवर होर्डिंग्ज लटकविण्यात आले होते. असेच एक होर्डिंग्ज वाऱ्यामुळे पडून दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सिडको उड्डाणपुलावर घडली होती. मात्र या घटनेनंतरही कार्यकर्त्यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून आले होते. तर महापालिका प्रशासनाकडूनही होर्डिंग्ज काढण्याचे धाडस करण्यात आले नाही.

असे आहे मुख्यमंत्र्यांचे ट्विट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केलेले ट्विटमध्ये पुण्यातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिंग्जविरोधातील कारवाईचे कौतुक केले. बेकायदेशीर होर्डिंग्ज ही सर्वत्रच मोठी समस्या असून, त्यावर सातत्याने व नियमितपणे कारवाई झाली पाहिजे. नियम हे जीआर किंवा शासकीय दस्तऐवज प्रकशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचेसुद्धा असतात, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी या ट्विटद्वारे सामान्य नागरिकांसह प्रशासनाला करून दिली आहे. तसेच नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाला खबरदारी घेण्याचे आणि जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.

असे आहे मुख्यमंत्र्यांचे ट्विट

होर्डिंग्जमुक्त शहर ही संकल्पना छत्रपती संभाजीनगर महापालिका आधीपासूनच राबवित आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमुळे आम्हांला चांगले बळ मिळाले आहे. झिरो टॉलरन्स ही मोहीम राबविता येईल. होर्डिंग्जमुक्त शहर मोहिम यापुढे अजून गतीने सुरू ठेवली जाईल. जे जे कोणी शहराचं विद्रूपिकरण करतील, नियमाचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. : अमोल येडगे, आयुक्त.

बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई सुरूच राहणार : महापौर

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने बेकायदा होर्डिंग्जविरोधात मागील अनेक महिन्यापासून मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत कारवाया केल्या जात आहेत. ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार आहे. शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी आपलं शहर स्वच्छ आणि होर्डिंग्जमुक्त ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. : समीर राजूरकर, महापौर.

Read About : मुकुंदवाडी – बाळापूर अंडरपासच्या कामात ‘शिवाजीनगर’प्रमाणे चुका नको

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.