पहाटेच पाठवला मेल : अलीकडेच एक हजार नोकऱ्यांवर आणली होती गदा
वॉशिंग्टन : Amazon Layoffs 2026 – टेक जगतातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनने पुन्हा एकदा नोकरकपात केली असून, यावेळी २५० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. हे कर्मचारी ‘डिव्हाइसेस युनिट’मध्ये कार्यरत होते. या युनिटद्वारे किंडल आणि इकोसारखी उत्पादने बनवली जातात.
या कर्मचाºयांना भल्या सकाळीच कंपनीकडून ई-मेल आणि टेक्स्ट मेसेज करून हा निर्णय कळविण्यात आला. यातील बहुतांश कर्मचाºयांचा संबंध सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटशी होता. अॅमेझॉनच्या उपाध्यक्ष चेरी रॉबिन्सन यांनी कर्मचाºयांना हा मेल पाठवला. ‘कंपनीने आपल्या रचनेचा सखोल आढावा घेतला आणि त्यानंतरच हे कपातीचे पाऊल उचलण्यात आले आहे. हा अत्यंत ‘कठीण निर्णय’ आहे, असे रॉबिन्सन यांनी या मेलमध्ये म्हटले आहे.
कंपनीने सकाळी-सकाळी अशा प्रकारे नोकरीवर काढल्याचा मेसेज पाठविण्याची ही पहिलीच वेळ नाही; यापूर्वी मेटा आणि ओरॅकलसारख्या मोठ्या कंपन्यांनीही अशाच प्रकारे कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. अॅमेझॉननेही या वृत्ताला दुजोरा दिला असून, ‘कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आमच्या प्रॉडक्ट रोडमॅपशी जुळवून घेण्यासाठी आम्ही हा छोटासा निर्णय घेतला आहे,’ असे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
नोकऱ्या का जात आहेत?
अॅमेझॉन सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर (एआय) पाण्यासारखा पैसा ओतत आहे. या एकाच वर्षात कंपनी एआयवर तब्बल २२० अब्ज डॉलर्स खर्च करण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते, एआय आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा मुख्य भाग बनत असून, डेव्हलपरना या बदलाशी जुळवून घ्यावे लागेल. ज्या दिवशी ही कपात झाली, त्याच दिवशी कंपनीने अॅलेक्सावर चालणारी पाच नवी उपकरणे (जसे की इको शो १६, अॅलेक्सा फोटो फ्रेम आणि इको टाईम बेडसाइड क्लॉक) लाँच केली. या महिन्याच्या सुरुवातीलाच अॅमेझॉनने आपल्या रिटेल विभागातून १,००० जणांना कामावरून कमी केले होते. याशिवाय जानेवारी आणि गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्येही मोठ्या प्रमाणावर कपात केली होती.
संपूर्ण टेक जगतात मंदीचे वारे
फक्त अॅमेझॉनच नव्हे, तर संपूर्ण टेक क्षेत्रात सध्या नोकरकपातीचे सत्र सुरू आहे. लेआॅफ्स.एफवायआयच्या आकडेवारीनुसार, या वर्षात आतापर्यंत १ लाख ३५ हजारांहून अधिक टेक नोकºया संपुष्टात आल्या आहेत. नुकतीच ड्रॉपबॉक्स कंपनीनेही त्यांच्या जागतिक कर्मचाºयांपैकी ९ टक्के कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टनेही आपल्या ६०,००० हून अधिक कर्मचाºयांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देऊ केला आहे. शिवाय अलीकडेच इनोडाटाचे भारतातील ५५० कर्मचाºयांसह जगभरातील अनेक कर्मचाºयांना कामावरून कमी केले आहे.
Read About : Japanese GCCs in India : अरे वा…100 हून अधिक जपानी कंपन्यांची भारतात जागतिक क्षमता केंद्रे
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.