म्हणाली, ‘क्लिप पाहून निर्णय घेऊ नका’
मुंबई : Asif Khan Love Gill friendship : बिग बॉस-२०’च्या घरातील आसिफ खान आणि लव गिल यांची मैत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. दोघांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आसिफच्या वैवाहिक आयुष्याबाबतही चर्चा सुरू झाली. या चर्चांवर आता आसिफची पत्नी जेबा हिने नाराजी व्यक्त केली असून, सोशल मीडियावरील छोट्या क्लिप्स पाहून निष्कर्ष काढू नका, असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे.
छोट्या क्लिप्सवरून सुरू झाल्या चर्चा
‘बिग बॉस’च्या घरातील आसिफ आणि लवचे काही क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओंमध्ये दोघांमधील मैत्री आणि जवळीक दिसत असल्याचे सांगत काही नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तर या मैत्रीचा आसिफच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चाही सुरू केली. या सगळ्यानंतर जेबाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली.
‘काही सेकंदांचा व्हिडिओ संपूर्ण सत्य सांगत नाही’
जेबाने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या छोट्या क्लिप्सवरून आसिफबद्दल मत बनवू नका, असे आवाहन केले. तिच्या मते, काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण परिस्थिती दिसत नाही.
‘आसिफची पत्नी म्हणून मला हे स्पष्ट करायचे आहे की, माझ्या पतीबद्दल वेगवेगळ्या कथा तयार केल्या जात आहेत. विशेषत: शोमधील काही क्षण आणि आमच्या लग्नाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत,’ असे जेबाने म्हटले.
तिने पुढे चाहत्यांना ‘बिग बॉस’चे २४ तासांचे लाइव्ह फीड पाहण्याचा सल्ला दिला. त्यातून आसिफ तिच्याबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल आणि नात्याबद्दल किती वेळा बोलतो, हे स्पष्ट होईल, असे तिने सांगितले.
‘आमचं नातं मजबूत आहे’
आसिफच्या समर्थनार्थ बोलताना जेबाने त्यांच्या वैवाहिक नात्याबाबतही स्पष्ट भूमिका घेतली. आसिफला आपण जसा ओळखते, तसाच तो आजही असल्याचे तिने म्हटले. ‘तो माझ्यासाठी तोच आसिफ आहे, ज्याला मी ओळखते. आमचं नातं मजबूत आहे आणि आमच्यात चांगली समज आहे. आम्हाला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज नाही,’ असा स्पष्ट संदेश तिने दिला.
‘बिग बॉसचा गेम लग्नाशी जोडू नका’
- ‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक स्पर्धक आपापला गेम खेळत असतो. त्यामुळे शोमधील एखाद्या प्रसंगाचा आधार घेऊन कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा वैवाहिक नात्यावर प्रश्न उपस्थित करू नका, असेही जेबाने म्हटले.
- ‘घरात प्रत्येकजण आपला गेम खेळत आहे. त्यांना तो खेळू द्या. पण या गेमला कोणाच्या वैयक्तिक आयुष्याशी किंवा लग्नाशी जोडू नका,’ असे तिचे म्हणणे आहे.
‘आसिफची प्रवास पाहा आणि मग मत बनवा’
- जेबाने चाहत्यांना आसिफचा संपूर्ण ‘बिग बॉस’ प्रवास पाहण्याचे आवाहन केले आहे. काही सेकंदांची क्लिप एखादी वेगळी कथा निर्माण करू शकते, मात्र त्यामुळे संपूर्ण सत्य समोर येत नाही, असे तिने सांगितले.
- ‘आसिफला पाहा, त्याची जर्नी पाहा आणि तो जसा आहे, तसा त्याला समजून घ्या. काही क्लिप्स एक कथा तयार करू शकतात, पण त्या सत्य बदलू शकत नाहीत,’ असा संदेश जेबाने दिला.
व्हायरल क्लिप्समुळे पुन्हा चर्चेत आसिफ
‘बिग बॉस’च्या घरातील आसिफ आणि लवची मैत्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असतानाच जेबाच्या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाला आणखी रंग आला आहे. आसिफच्या पत्नीने थेट आपली भूमिका स्पष्ट केल्याने आता सोशल मीडियावरील चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
छोट्या क्लिप्सपेक्षा संपूर्ण संदर्भ महत्त्वाचा आहे, असा जेबाचा स्पष्ट संदेश आहे. त्यामुळे आसिफ-लवची मैत्री पुढे ‘बिग बॉस’च्या घरात आणखी कोणते वळण घेते, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Read About : The Royals Season 2 : ‘द रॉयल्स २’ मध्ये नवा लव्ह ट्रँगल ( Love Triangle)
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.