Ad Advertisement Ad Advertisement

The Royals Season 2 : ‘द रॉयल्स २’ मध्ये नवा लव्ह ट्रँगल ( Love Triangle)

ईशान खट्टर-सिनी शेट्टीसोबत गुरफतेह पिरजाडाची एंट्री

मुंबई: The Royals Season 2 : नेटफ्लिक्सची लोकप्रिय सीरिज ‘द रॉयल्स’ दुसऱ्या सीझनसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी कथा आणखी रोमँटिक आणि गुंतागुंतीची होणार असून ईशान खट्टर, सिनी शेट्टी आणि गुरफतेह पिरजादा या त्रिकुटाभोवती नव्या प्रेमकहाणीची गुंफण पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, सीझन २च्या चित्रिकरणाला या आठवड्यात उदयपूरमध्ये सुरुवात होणार आहे.

सिनीची नवी एंट्री

सीझन २ मध्ये सिनी शेट्टी नव्या महिला प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आगमनामुळे ईशान आणि गुरफतेहसोबतचं नातं कथानकाला नवं वळण देणार आहे.

गुरफतेह बनला तिसरा कोन

गुरफतेह पिरजादा सीरिजमध्ये ईशान खट्टरसोबत तिसऱ्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे दोघांमध्ये सिनी शेट्टीला केंद्रस्थानी ठेवून नवा लव्ह ट्रँगल रंगणार आहे.

नोराचाही कमबॅक

पहिल्या सीझनचा भाग असलेली नोरा फतेही दुसऱ्या सीझनमध्येही परतणार आहे. नव्या चेहऱ्यांसोबत तिची उपस्थिती सीरिजची रंगत कायम ठेवणार आहे.

काय होती पहिल्या सीझनची कहाणी?

पहिल्या सीझनमध्ये ईशानने साकारलेला प्रिन्स अविराज सिंह आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या राजघराण्याच्या इस्टेटला वाचवण्यासाठी भूमी पेडणेकरच्या सोफिया कनमनी शेखरसोबत भागीदारी करतो. सीरिजचा पहिला सीझन मे २०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

गुरफतेहची दमदार वाटचाल

गुरफतेह पिरजाडाने अलीकडेच ‘द रिव्होल्यूशनरीज’मध्ये क्रांतिकारक बाघा जतिनची भूमिका साकारली. त्यानंतर तो ‘लस्ट स्टोरीज ३’ मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. आता ‘कॉल मी बे २’, ‘अधूरे हम अधूरे तुम’ आणि पीरियड पॉलिटिकल ड्रामा ‘डायनेस्टी’ या आगामी प्रोजेक्ट्समधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

उदयपूरमध्ये सुरू होणार खेळ

ईशान, सिनी आणि गुरफतेह या नव्या त्रिकुटासह ‘द रॉयल्स २’चं चित्रिकरण उदयपूरमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे राजेशाही पार्श्वभूमीवरची प्रेमकहाणी यावेळी कोणतं वळण घेणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
राजेशाही तीच…पण प्रेमाचा खेळ नवा, ‘द रॉयल्स २’मध्ये कोण कुणाच्या मनावर राज्य करणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.

Read About: Textile Bricks From old Clothes : जुन्या कपड्यांपासून बनवली जातेय वीट
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.