६ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टी
छत्रपती संभाजीनगर : Bamu University Diwali Holiday दिवाळीच्या सणानिमित्त विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही सुट्टयांची प्रतीक्षा लागलेली असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिवाळी सुट्टयांची घोषणा केली आहे. विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमधील शैक्षणिक विभागांना ६ नोव्हेंबरपासून २४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या आनंदासोबतच विद्यार्थ्यांना काही दिवस अभ्यास आणि महाविद्यालयीन धावपळीतूनही विश्रांती मिळणार आहे.
कुलसचिव डॉ. संजय कवडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून २०२६ रोजी संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे अकॅडमिक कॅलेंडर जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार १५ जून २०२६ ते ३० एप्रिल २०२७ या कालावधीत शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पदवी अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षांना २७ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. उर्वरित पदवी परीक्षा तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टयांमध्ये विद्यार्थ्यांना सणाचा आनंद घेण्यासोबतच आगामी परीक्षांच्या तयारीसाठीही वेळ मिळणार आहे.
प्रशासकीय विभागांना केवळ सहा दिवस सुट्टी
शैक्षणिक विभागांप्रमाणेच विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांच्या प्रशासकीय विभागांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, प्रशासकीय विभागांना ६ ते ११ नोव्हेंबर या कालावधीतच सुट्टी असणार आहे. याबाबत विद्यापीठाच्या आस्थापना व शैक्षणिक विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Read About : Education Department Inspects 517 Private Schools- पटसंख्येच्या बनवाबनवीला शिक्षण विभागाचा दणका!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.