Ad Advertisement Ad Advertisement

Bank of Maharashtra Crop Loan – शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कर्जवाटप शिबिरांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर झोन च्या वतीने एकूण ९५३६ शेतकऱ्यांना १४०.९१ कोटी रुपये इतके कर्ज वाटप

छत्रपती संभाजीनगर :Bank of Maharashtra Crop Loan महाराष्ट्र शासनाच्या योजना अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध शाखांमार्फत विशेष पीककर्ज शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी व त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, या उद्देशाने संबंधित बँक शाखांनी शिबिराच्या एक दिवस आधी जवळील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना माहिती दिली व जनजागृती केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या शिबिरांबाबत उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. आयोजित विशेष शिबिरांना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. तसेच अनेक शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखांना भेट देऊन नवीन पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली व कर्जप्रकरणे सादर केली.

बँकेच्या विविध शाखांमार्फत पात्र शेतकऱ्यांच्या नवीन पीककर्जाच्या प्रस्तावांवर कार्यवाही करून अनेक शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित पात्र प्रस्तावांवरही नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.बँक ऑफ महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर झोन च्या वतीने एकूण ९५३६ शेतकऱ्यांना १४०.९१ कोटी रुपये इतके कर्ज वाटप करण्यात आले अन्य पात्र शेतकऱ्यांच्या प्रस्ताव जलद गतीने मंजूर करण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष शिबिरांमुळे शेतकऱ्यांना बँकिंग सेवा व कर्जप्रक्रिया सुलभतेने उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक व सहकार्याची भूमिका घेण्यात येत असून, जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे 

Read About : Sleep and Brain Health : मधुमेह, हृदयरुग्णांसाठी चांगली झोप ठरते मेंदूची ढाल; 4 लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.