तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज
बंगळुरू – Bengaluru Transformer Blast बंगळुरू येथील महालक्ष्मी लेआउट परिसरातील ॲमेझॉन कार्यालया जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ट्रान्सफॉर्मर बॉक्सचा अचानक भीषण स्फोट झाला.या घटनेत फुटपाथवरून जाणारा एक पादचारी गंभीररीत्या भाजून जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार, तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगळुरू विद्युत पुरवठा कंपनीचे अधिकारी आणि पोलीस या स्फोटामागचे नेमके तांत्रिक कारण शोधण्यासाठी घटनेचा सखोल तपास करत आहेत.
Read About : Mussoorie Accident : चक्रता-मसुरी महामार्गावर कार २०० मीटर दरीत कोसळली; १ ठार, २ गंभीर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.