केवळ एका तासाच्या ब्रेन स्कॅन डेटावर पाहिलेल्या दृश्याचे चित्र तयार करणे शक्य, मात्र मनातील गुप्त विचार वाचण्याची क्षमता नाही
तेल अवीव (इस्रायल) : Brain-IT AI Technology मानवी मेंदूमध्ये चालणाऱ्या दृश्य हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण करून संबंधित व्यक्ती नेमके काय पाहत आहे, याचे थेट चित्र तयार करणारी एक प्रगत एआय प्रणाली शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. इस्रायलमधील वाईझमन इन्स्टट्यिूट ऑफ सायन्सचे प्राध्यापक मिचल इरानी आणि रोमन बेली यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी ब्रेन-आईटी नावाचे हे नाविन्यपूर्ण मॉडेल तयार केले आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती डोळ्यांनी कोणतेही चित्र पाहते, तेव्हा तिच्या मेंदूच्या व्हिज्युअल कॉर्टेक्स भागातील रक्तप्रवाहात सूक्ष्म बदल होतात. शास्त्रज्ञांनी एफएमआरआई स्कॅनच्या मदतीने या बदलांची नोंद घेतली. ब्रेन-आईटी प्रणाली मेंदूतील या सिग्नल्सचे दोन भागांत विश्लेषण करते. यातील एक भाग चित्राची रचना आणि रंग ओळखतो, तर दुसरा भाग चित्रात नेमके कोणते घटक आहेत याचा अंदाज बांधतो. त्यानंतर या माहितीच्या आधारे एआय इमेज जनरेटर मूळ चित्राची हुबेहूब प्रतिकृती तयार करतो.
यापूर्वीच्या अशा तंत्रज्ञानाला प्रत्येक नवीन व्यक्तीच्या मेंदूचा अभ्यास करण्यासाठी सुमारे ४० तासांच्या महागड्या स्कॅन डेटाची गरज भासत असे. मात्र, सिम्युलेटेड डेटाचा वापर केल्यामुळे नवीन प्रणालीला केवळ एक तासाच्या स्कॅनवरही तितकेच अचूक चित्र तयार करणे शक्य झाले आहे. सध्या हे तंत्रज्ञान व्यक्ती प्रत्यक्षात जे पाहत आहे त्याचेच चित्र काढते, मनातील गुप्त विचार वाचत नाही. तरीही, भविष्यात अर्धांगवायू झालेल्या किंवा बोलू न शकणाऱ्या रुग्णांना त्यांच्या विचारांद्वारे संवाद साधण्यास मदत करण्यासाठी तसेच स्वप्नांचे गूढ उकलण्यासाठी हा शोध अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Firecracker Smoke and Air Pollution – फटाक्यांचा धूर हवेतून लवकर गायब का होत नाही?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.