डिजिटल उपकरणे, महत्त्वाची कागदपत्रे जप्त
नवी दिल्ली : CBI raids in Mahadev betting app case बहुचर्चित महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲपप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) ६ राज्यांत ३३ ठिकाणी छापे टाकण्याची कारवाई शनिवारी केली आहे. यात प्रामुख्याने डिजिटल उपकरणे, मोबाईल फोन आणि अशी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, ज्यावरून ‘म्यूल’ बँक खाती आणि हवालाकांडाद्वारे पैशांचे व्यवहार झाल्याचे संकेत मिळत आहेत.
महादेव ऑनलाइन ॲपचा मुख्य प्रवर्तक सौरभ चंद्राकरचे ओमानमधून प्रत्यार्पणानंतर त्याने केलेल्या खुलाशांच्या आधारे सीबीआयने आता छापेमार कारवाई केली. गेल्या काही दिवसांत दिल्ली, मुंबई, नागपूर, अमृतसर, भोपाळ आणि रायपूरसह विविध ठिकाणी केलेल्या या छापेमारीत सट्टेबाजी ॲपचे पॅनल चालवणाऱ्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.
ताज्या कारवाईत अनेक ठिकाणी सट्टेबाजी आणि जुगाराचे ऑनलाइन पॅनल सक्रिय असल्याचे आढळले; जे नंतर निष्क्रिय करण्यात आले, असे सीबीआयच्या प्रवक्त्या बिना यादव यांनी सांगितले. चंद्राकरच्या चौकशीदरम्यान या ॲपच्या संचालनाबाबत आणि भारतातील त्याच्या पॅनलचालकांच्या नेटवर्कबद्दल माहिती मिळाली. तपासादरम्यान गोळा केलेले दस्तावेज व डिजिटल पुराव्यांच्या आधारावरही चंद्राकरची चौकशी करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
सट्टेबाजी ॲपचे संचलन परदेशातून
या सट्टेबाजी ॲपचे संचलन परदेशातून एका मुख्य कार्यालयाद्वारे केले जात आहे. भारतात त्याच्या पॅनल संचालकांचे एक मोठे जाळे आहे. हे संचालक ग्राहकांच्या ओळख क्रमांकाचे (आयडी) व्यवस्थापन करतात आणि इतर लोकांच्या नावावर, विशेषकरून उघडलेल्या किंवा भाड्याने घेतलेल्या बँक खात्यामध्ये सट्टेबाजीची रक्कम जमा करतात आणि त्यानंतर नफ्याची रक्कम हवालाद्वारे परदेशात पाठवली जाते, असे त्यांनी सांगितले.
६,००० कोटींच्या घोटाळ्यात दोन एफआयआर
छत्तीसगड सरकारने तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर एजन्सीने ६,००० कोटी रुपयांच्या या सट्टेबाजी घोटाळ्यात दोन एफआयआर नोंदवले आहेत. परदेशात असलेल्या आरोपींसह इतर आरोपी या नेटवर्कच्या संचलनात मदत करणारे लोक आणि संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचा तपास सुरू आहे. पळून गेलेल्या इतर आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी पावले उचलली जात आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Microsoft Global Outage – तंत्रज्ञान जगतात खळबळ
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.