Ad Advertisement Ad Advertisement

Pakistan Sets Up 80 Terror Launch Pads in PoK – पाकिस्तानने पीओकेमध्ये ८० दहशतवादी लाँचपॅड उभारले

बर्फवृष्टीपूर्वी भारतात घुसखोरीची तयारी; थर्मल सेन्सर आणि अँटी-ड्रोन सिस्टीमही बसवले

नवी दिल्ली : Pakistan Sets Up 80 Terror Launch Pads in PoK पाकिस्तान हिवाळ्यात बर्फवृष्टी सुरू होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याची तयारी करत आहे. यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) सुमारे ८० लाँचपॅड उभारले आहेत. यातील ६० हून अधिक लाँचपॅड जम्मू क्षेत्रातील नियंत्रण रेषेसमोर (एलओसी) आहेत. या तळांवर थर्मल सेन्सर आणि अँटी-ड्रोन सिस्टीम बसवण्यात आले आहेत. पाकच्या या ताज्या हालचालींमुळे भारतीय गुप्तचर संस्थांना अलर्ट जारी करण्यात आला असून, सीमेवरही कडक निगरानी ठेवली जात आहे.

पाकिस्तान आता त्यांचे दहशतवादी भारतात घुसवण्यासाठी नव्या चाली खेळत आहे. सीमेपलीकडे अर्थात पीओकेमध्ये लाँचपॅड बनवण्यात आले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या इशाऱ्यावर गुप्तचर संस्था आयएसआय हे लाँचपॅड चालवत आहे. येथे कुख्यात प्रतिबंधित लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे ४ ते ५ दहशतवादी ठेवण्यात आले आहेत. ते भारतीय सीमेत घुसखोरी करण्याची संधी मिळण्याची वाट पाहत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईदरम्यान पाकिस्तानचे अनेक मोठे दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले होते. त्यानंतर पाकिस्तानने आपली रणनीती बदलली आहे. आता मोठ्या तळांऐवजी छोटे-छोटे लाँचपॅड तयार केले जात आहेत.

तळ छोटे असल्याने शोध घेणे कठीण

प्रत्येक लाँचपॅडवर कमी संख्येने दहशतवादी ठेवले जात आहेत. यामुळे भारतीय लष्कराने कोणत्याही एका तळावर कारवाई केली तरी संपूर्ण दहशतवादी नेटवर्कचे एकाच वेळी नुकसान होणार नाही. तळ छोटे असल्याने त्यांचा शोध घेणेही कठीण होऊ शकते, असे पाकिस्तानला वाटत आहे.

खराब हवामानातही माणसांच्या उपस्थितीचा शोध

पीओकेमध्ये उभारलेल्या लाँचपॅडवर थर्मल सेन्सर आणि अँटी-ड्रोन सिस्टीम बसवण्यात आले आहेत. थर्मल सेन्सरच्या मदतीने अंधारात आणि खराब हवामानातही माणसांच्या उपस्थितीचा शोध घेता येतो. तर, अँटी-ड्रोन सिस्टीमचा वापर टेहळणीसाठी येणाऱ्या ड्रोनचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी केला जातो. या उपकरणांच्या माध्यमातून दहशतवादी तळांची सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषत: हिवाळ्यात बर्फवृष्टीदरम्यान घुसखोरीची योजना लक्षात घेऊन ही व्यवस्था केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read About : Cyberbullying among students worldwide – जगभरातील दहापैकी 1 विद्यार्थ्याला सायबर बुलिंगचा फटका

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.