Chennai dead bodies video : शवागृहात बेकायदेशीर प्रवेश करून व्हिडीओ शूट, २०० रुपये देऊन मिळवली चावी
चेन्नई : Chennai mortuary reel case: सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात चेन्नईतील तिघांनी रुग्णालयाच्या शवागृहातच प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेहांचे व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियासाठी वापरण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिघांना अटक केली. मात्र, न्यायालयाने त्यांना त्याच दिवशी जामीन मंजूर केला. हा प्रकार सरकारी स्टॅन्ली रुग्णालयातील शवागृहात घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, व्यासारपाडी येथील सतीशकुमार (२५) आणि दीना ऊर्फ दिनेशकुमार (३०) हे दोघे गुरुवारी रुग्णालयात आले होते. त्यांचा साथीदार आनंद याचा मृतदेह पाहण्यासाठी ते येथे आले होते. आनंद हा एर्नावूर परिसरातील इतिहासशीटर म्हणून पोलिसांच्या नोंदीत होता.
hospital mortuary video, Chennai police : मृतदेह ठेवलेल्या प्रतिबंधित भागात प्रवेश करण्यासाठी दोघांनी रुग्णालयातील बॅटरी वाहनचालक व्यासारपाडी शंकर याची मदत घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. शंकरच्या माध्यमातून त्यांनी शवागृह कर्मचारी श्रीनिवासन याला २०० रुपये दिले. त्यानंतर त्यांना शवागृहाची चावी मिळाली. चावी मिळाल्यानंतर दोघांनी शवागृहात प्रवेश केला आणि तेथील मृतदेहांचे मोबाईलवरून व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर डॉ. मळर यांनी रुग्णालयातील पोलिस चौकीत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी सतीशकुमार, दीना आणि शंकर या तिघांना अटक केली.
तिन्ही आरोपींना त्याच दिवशी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. सोशल मीडियासाठी व्हिडीओ आणि रील बनवताना रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी प्रवेश करणे आणि मृतदेहांचे चित्रीकरण करणे हा गंभीर प्रकार मानला जात आहे. या घटनेमुळे सोशल मीडिया कंटेंटच्या नावाखाली नियम आणि संवेदनशीलतेकडे दुर्लक्ष करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
Read About: Atul Save Family Attack
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.