Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada drought, Marathwada rainfall deficit पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यात दुष्काळाची चाहूल

प्रशासनाकडून शासनाकडे अहवाल सादर

छत्रपती संभाजीनगर : Marathwada drought, Marathwada rainfall deficit महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार विभागीय प्रशासनाने मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीचा वस्तूनिष्ठ अहवाल शासनाकडे मंगळवारी (दि.१५) सादर केला आहे. या अहवालात मरावाड्यातील कमी पर्जन्यमान, मान्सूनातील खंड, धरणातील नगण्य पाणीसाठा, पिकांची खराब परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि भविष्यात निर्माण होणारी चारा टंचाई याबाबत सविस्तर विवेचन केले आहे. या अहवालावरून मराठवाड्यात दुष्काळाची चाहूल लागल्याचे चित्र आहे. या अहवालावरून शासन दुष्काळी परिस्थितीबाबत काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

विभागीय प्रशासनाने दिलेल्या अहवालात मराठवाड्यातील पर्जन्यमानाबाबत नमूद केले आहे की, जून ते सप्टेंबर या पावसाळी कालावधीतील बहुतांश दिवस उलटून गेले असतानाही मराठवाड्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत मोठी तूट कायम आहे. १४ सप्टेंबरपर्यंत विभागात सरासरी ५९१ मि.मी. अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत प्रत्यक्ष ४०५.६ मि.मी. पाऊस झाला असून, पावसाची टक्केवारी अवघी ६८.६३ टक्के आहे. १४ सप्टेंबरपर्यंत लातूर जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे ५२.२२ टक्के, तर परभणीत ५५.४५ टक्के आणि धाराशिवमध्ये ६१.५७ टक्के पर्जन्यमान झाले आहे.

बीडमध्ये ६४.६९ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८३.२१ टक्के, जालन्यात ८०.९९ टक्के, नांदेडमध्ये ७७.२७ टक्के आणि हिंगोलीत ७०.५९ टक्के पाऊस झाला आहे. विभागात तब्बल ३१.३७ टक्के पावसाची तूट आहे. विभागातील ७६ तालुक्यांच्या स्थितीकडे पाहता ४७ तालुक्यांत अपेक्षित पावसाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील २८ तालुक्यांपैकी २ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १३ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के आणि ११ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. केवळ दोन तालुक्यांत अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. मराठवाड्यातील पावसाची सद्यस्थिती पाहता, ही केवळ पावसाची तूट राहिलेली नसून पिके, पाणी आणि चारा या तिन्ही आघाड्यांवर दबाव वाढण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप उत्पादनातील घट, पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी, टँकरची गरज आणि चारा टंचाई या समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

पावसाने खंड दिल्याने परिस्थिती गंभीर

पावसाचे प्रमाण कमी असतानाच अनेक भागांत पावसाने मोठे खंड दिल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५० मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड आहे. जालना जिल्ह्यात ३० मंडळांना २१ दिवसांपेक्षा अधिक खंड आहे. बीडमध्ये अनुक्रमे ३८, २४ आणि ११ मंडळांमध्ये असा खंड आहे. विशेष म्हणजे बीड आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांतील काही मंडळांमध्ये ४२ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे.

धरणांमध्येही समाधानकारक साठा नाही

पावसाअभावी खरीप पिकांबरोबरच भविष्यातील पाणीपुरवठ्याची चिंता वाढली आहे. विभागातील ७८० लघू प्रकल्पांपैकी ५९६ प्रकल्पांमध्ये केवळ ० ते २५ टक्के साठा आहे. ७३ प्रकल्पांत २६ ते ५० टक्के, ४३ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के आणि ६६ प्रकल्पांत ७६ ते १०० टक्के साठा आहे. ७६ मध्यम प्रकल्पांपैकी ५४ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंतच साठा आहे.

टँकरवर १७१ गावांची तहान

पावसाअभावी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ लागला आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत सध्या ९४ गावांना आणि ४७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी एकूण १७१ टँकर कार्यरत असून, त्यापैकी १६८ टँकर खासगी आणि तीन शासकीय आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत प्रत्येकी ७० टँकर कार्यरत आहेत. जालना जिल्ह्यात २२, तर धाराशिवमध्ये ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

खरीप पिके संकटात; उत्पादन घटण्याची शक्यता

पावसाच्या खंडाचा सर्वाधिक परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. सोयाबीन हे मराठवाड्यातील प्रमुख पीक असून जवळपास सर्व जिल्ह्यांत पावसाच्या ताणामुळे शेंगा लागणे, भरणे, पीक सुकणे आणि उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कापूस पिकात पाते, फुले व बोंड अवस्थेवर पावसाच्या खंडाचा परिणाम होत असून, काही भागांत फुलगळ आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तूर पिकाच्या वाढीवरही पावसाच्या तुटीचा परिणाम होत असून, अनेक जिल्ह्यांत उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाण्याबरोबरच भविष्यातील चारा उपलब्धतेचे आव्हानही समोर आले आहे. विभागातील उपलब्ध चारा आणि अपेक्षित गरज याचा विचार करता सरासरी १४४ दिवसांचा चारा उपलब्ध असल्याचे अहवालात नमूद आहे.

Read About: Marathwada crop condition, Marathwada drought situation 

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Loading comments...