Ad Advertisement Ad Advertisement

CTU Implementation Agreement 2047 – ‘सीटीयू’ कार्यान्वित करण्यासाठी मनपाने केला मित्र संस्थेशी करार

‘विकसित छत्रपती संभाजीनगर २०४७’ ला मिळणार दिशा : असा करार करणारी पहिली महानगरपालिका

छत्रपती संभाजीनगर : CTU Implementation Agreement 2047 विकासासाठी धोरणात्मक नियोजन, अंमलबजावणी करणारी एक रचना असलेल्या ‘सिटी ट्रान्सफॉर्मशन युनिट’ (‘सीटीयू’)कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिकेने गुरुवारी (दि.५) मुंबईत ‘मित्र’ या राज्य सरकारच्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला. अशा प्रकारचा करार करणारी ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे. या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर २०४७ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जाईल. सोबतच विस्तारणाऱ्या शहराला निश्चित दिशा देण्याची, भविष्यातील लोकसंख्येनुसार आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी कृती कार्यक्रम आखून तोच राबवला जाईल.

संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे सीईओ तथा मनपा आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र इन्स्टट्यिूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, ऑल इंडिया इन्स्टट्यिूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंटचे (एआयआयआयएलएसजी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयराज फाटक, प्रादेशिक संचालक जीवन सोनावणे, मित्रचे वरिष्ठ सल्लागार निखिल नांगुडे, क्षेत्र तज्ज्ञ आनंद जोशी आदींनी या करारावर स्वाक्षरी केली. महापौर समीर राजूरकर यांच्या संकल्पनेतून ही विकास मेढ रोवण्यात आली आहे. हा सामंजस्य करार ‘विकसित छत्रपती संभाजीनगर २०४७’ चे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्यात्मक नियोजन, तांत्रिक सहाय्य, प्रकल्प विकास आणि पायाभूत सुविधा आणि आर्थिक शाश्वत स्रोत उभारणीसाठी एक संस्थात्मक चौकट म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट’ चे असे राहिल काम

‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट’ (सीटीयू) स्थापन केले जाईल. हे युनिट महानगरपालिकेसाठी धोरणात्मक आणि तांत्रिक सहाय्यक यंत्रणा म्हणून काम करेल. धोरणात्मक नागरी नियोजन, प्रकल्प ओळख, निर्मिती व प्राधान्यक्रम ठरवणे, आंतर-विभागीय समन्वय, प्रकल्प देखरेख आणि साधनसामग्री उभारणीस सुलभ करेल. ‘मित्र’ धोरणात्मक मार्गदर्शन करेल आणि राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमांशी मेळ घालण्यास मदत करेल, तर एआयआयआयएलएसजी बेसलाइन मूल्यांकन, नागरी नियोजन, मनपा प्रशासन आणि आर्थिक सक्षमीकरणात तांत्रिक कौशल्य प्रदान करेल.

Read About : Antarctica Glacier Melting : नासाच्या उपग्रह छायाचित्रांत दिसली कवटीसारखी रचना
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.