१३ लाख ३८ हजार मेट्रिक टन गाळप, ९ लाख ८० हजार क्विं. साखर उत्पादन
छत्रपती संभाजीनगर : 14 Factories Begin Operations छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत १४ कारखान्यांनी ४ नोव्हेंबर २०२६ अखेर १३ लाख ३८ हजार ७१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून, ९ लाख ८० हजार १६५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यायांतर्गत २७ पैकी २६ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. मात्र, अद्यापही ऊस दराची कोंडी न फुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार यंदाच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्यासह राज्यातील एकूण २२४ साखर कारखान्यांपैकी १२७ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. यात ६२ सहकारी आणि ६५ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. अद्याप ९७ कारखान्यांचे गाळप सुरू झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामाच्या प्रारंभीच साखर उद्योगासमोर आव्हान उभे राहिले आहे. साखर आयुक्तालयाच्या २ नोव्हेंबरअखेरच्या अहवालानुसार, राज्यात आतापर्यंत १० लाख १८ हजार ४५० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १० लाख ५४ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
गाळप हंगामाला वेग
साखरेची संभाव्य टंचाई आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातील वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन मंत्री समितीच्या बैठकीत परवानाधारक कारखान्यांना आवश्यकतेनुसार १५ ऑक्टोबरपूर्वीच गाळप सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जल्ह्यिात स्वभिमानीसह विविध शेतकरी संघटनांनी पहल्यिा उचलीसाठी कारखाना बंद आंदोलन सुरू आहे. अजून दराचा तोडगा निघालेला नाही. परिणामी, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड विभागांनी यंदाच्या गाळप हंगामात गती घेतली आहे.
विभागनिहाय सुरू कारखाने आणि कंसात एकूण साखर कारखाने पुढीलप्रमाणे :
छत्रपती संभाजीनगर १४ (४१), नांदेड २६ (२७), कोल्हापूर १४ (४१), पुणे २४ (२६), सोलापूर २७ (५०), अहल्यिानगर २० (२३), अमरावती २ (११), नागपूर ० (५)
किफायतशीर भाव मिळेल
यंदा दुष्काळामुळे मराठवाड्यासह सर्वत्र तीव्र पाणीटंचाई आहे. यामुळे गाळप हंगामाला अद्याप म्हणावा तसा वेग आलेला नाही. हंगाम लांबला, तर उसाच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा उसाचा उताराही कमी येत असून, उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना यंदा किमान ४ ते ५ हजार रुपये प्रतिटन असा किफायतशी भाव मिळेल, अशी अपेक्षा.
दीपक चव्हाण, साखर उद्योगातील अभ्यासक्र
Read About : Janaki Ammal sugarcane research : ऊस झाला गोड! 2026
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.