Ad Advertisement Ad Advertisement

Workplace Safety Ergonomics CMIA – कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी अर्गोनॉमिक्स महत्त्वाचे

सीएमआयएमध्ये मार्गदर्शन सत्र; १०० हून अधिक उद्योजक व प्रतिनिधींचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर : Workplace Safety Ergonomics CMIA – कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी सुरक्षित कार्यपद्धती आणि कार्यस्थळाची योग्य रचना महत्त्वाची आहे. यामुळे अपघात, पाठदुखी, मानदुखी तसेच व्यावसायिक आजारांचा धोका कमी होऊ शकतो, असे प्रतिपादन तज्ज्ञांनी केले.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए) आणि ह्युमनकेअर वर्ल्डवाइड यांच्या संयुक्त विद्यमाने, व्यवसायजन्य सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या सहकार्याने बजाज भवन येथील सीएमआयए सभागृहात मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.

यात १०० हून अधिक उद्योग प्रतिनिधींनी सहभाग घेतला.सहाय्यक संचालक डॉ. आकाश तडवडकर यांनी अर्गोनॉमिक्सचे महत्त्व स्पष्ट करताना कर्मचाऱ्यांच्या उंचीनुसार टेबल, खुर्ची आणि कामाची साधने असावीत, असे सांगितले. डॉ. केदार बरडे यांनी नियमित आरोग्य तपासणी, जोखीम मूल्यांकन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला.

डॉ. उपेंद्र सोनटक्के यांनी उद्योगांसाठी उपलब्ध आरोग्यसेवा, रुग्णवाहिका, आपत्कालीन वैद्यकीय मदत आणि फिजिओथेरपी सेवांची माहिती दिली. वजन उचलताना घ्यावयाची काळजी, योग्य बैठक व्यवस्था, शरीराची ठेवण आणि कामादरम्यान नियमित हालचाली यांचे महत्त्वही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी डॉ. प्रमोद सुरसे यांनी पुढाकार घेतला.

सूत्रसंचालन सीएमआयएचे कार्यकारी सचिव रवींद्र मानवतकर यांनी केले, तर मानद सचिव अजिंक्य सावे यांनी आभार मानले. सहाय्यक संचालिका शीतल गायकवाड यांचीही उपस्थिती होती.

Read About : Supreme Court on Digital Fraud- डिजिटल फसवणूक बळींना निष्काळजी बँकांनीच द्यावी भरपाई
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.