मोजणी करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक
छत्रपती संभाजीनगर : graduate election counting 45 hours मराठवाडा पदवीधर मतदार संघाची यावेळेची मतमोजणी तब्बल तीन दिवस म्हणजे शुक्रवारी पहाटेपर्यंत चालली. मोजणी करताना अधिकारी कर्मचारी यांची चांगलीच दमछाक झाली. निकाल गुरुवारी मध्यरात्री २ वा. अंतिम झाल्यानंतर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला. मात्र, निवडणूक आयोगाकडून घोषणेची परवानगी मिळण्यास तब्बल तीन तास गेले. लवकर परवानगी न मिळाल्याने उमेदवारासह सर्वच अधिकारी ताटकळले. सर्वाधिक मते घेणारे राष्ट्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील याना पहाटे सव्वापाच वाजता निवडीचे प्रमाणपत्र दिले.
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील हे १८१२४ मतांनी विजयी झाले. तिसऱ्या फेरीनंतरही ८८५५८ मतांचा कोटा एकही उमेदवार पूर्ण न करू शकल्याने वगळण्याची प्रक्रिया राबिवण्यात आली. तब्बल ३९ उमेदवारांची वगळणी (इल्यूमिनेशन) केल्यानंतरही डाँ. प्रतापसिंह पाटील यांना मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. मात्र, डाँ. प्रतापसिंह पाटील यांना सर्वाधिक ८५८७६ मते मिळाल्यामुळे त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. तर राष्टवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाचे आ.सतीश चव्हाण यांना ६७७५२ मते मिळाली. विजयाची खात्री होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विभागात सर्वत्र जल्लोष केला. मतमोजणीची प्रक्रिया तब्बल ४५ तास चालली. शुक्रवारी पहाटे २ वाजता संपूर्ण आकडेवारी तपासून ती केंद्रीय निवणूक आयोगाकडे पाठविण्यात आली. सर्वाधिक मते घेणारे डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयी घोषीत करून त्यांना निवडीचे प्रमाणपत्र देण्यास परवानगी द्यावी, असे ईमेल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळण्यास बराच विलंब होऊ लागला. अधीच तब्बल ४२ तास सलग मतमोजणी करून अधिकारी, कर्मचारी थकून गेले होते. सर्वांना घरी जाऊन आराम करण्याची इच्छा होती. परंतु परवानगी काही येत नव्हती. त्यामुळे अधिकारी खुर्चीवर बसल्या जागीच थकून डुलक्या घेताना दिसून येत होते. मेलचे उत्तर मिळत नसल्याने नंतर फोन करून मेलचे उत्तर देण्याबाबतही सांगण्यात आले. परंतु त्यानंतरही तब्बल तीन तास अधिकाऱ्यांना बसून राहावे लागले. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही वैतागून गेले. पहाटे पाच वाजता परवानगीचा मेल प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर सव्वापाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चावरे यांच्याहस्ते डॉ. प्रतापसिंह पाटील यांना निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर साडेपाच वाजता अधिकारी, कर्मचारी मतमोजणी केंद्राबाहेर पडले.
३९ उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीची मते मोजली
मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने तब्बल ३९ उमेदवारांची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजावी लागली. उबाठाचे दिलीप घुगे यांची १८८१ मते सतीश चव्हाण यांना २२८५ मते तर ४७५ मते रविराज साबळे यांना ट्रान्सफर झाली. तर ३९ व्या फेरीत रविराज साबळे यांची ३२४१ मते सतीश चव्हाण यांना तर ६४६९ मते डाँ. प्रतापसिंह पाटील यांना टान्सफर झाली. सर्व मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने सर्वाधिक मते घेणारे डाँ. प्रतापसिंह पाटील यांना गुरुवारी पहाटे ५.१५ वाजता विजयी घोषीत करण्यात आले. पाटील यांना एकूण ८५८७६ मते मिळाली. तर राष्टवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाचे आ.सतीश चव्हाण यांना ६७७५२ मते मिळाली. यावरून प्रतापसिंह पाटील हे १८१२४ मतांनी विजयी झाले.
कर्मचाऱ्यांचा वाढला रक्तदाब
चिकलठाणा एमआयडीसीतील एका कंपनीच्या आवारात मतमोजणीचे केंद्र होते. प्रसाधनगृहाची सुविधा नसल्यामुळे तेथे चार व्हॅनिटी व्हॅन ठेवल्या होत्या. तसेच मनपाचे प्रसाधनगृह देखील होते. ऑक्टोबर हिटमुळे १,२०० टनाचे एसी कंपनीच्या गोदामात दोन दिवसांसाठी लावले होते. मोजणीसाठी असणारे कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यामुळे गर्दी होणार असल्याचे गृहीत धरून एसी बसविले होते. बाहेर मोठा मंडप दिला होता. मतमोजणी जास्त काळ चालणार हे गृहीत धरून ही व्यवस्था करण्यात आली होती. ४५ तास मतमोजणी निरंतर सुरू होती, असा मतमोजणीचा प्रसंगी पहिल्यांदाच अनुभवास आल्यामुळे अनेक कर्मचारी वैतागले होते. तसेच मतमोजणी दरम्यान सुमारे ३० ते ३५ कर्मचाऱ्यांचा रक्तदाब वाढला. वैद्यकीय पथकाने कर्मचाऱ्यांची तपासणी केली. तसेच फिजिओथेरपिस्ट देखील केंद्रामध्ये तैनात होते.
READ ABOUT : Pregnant Woman Suicide – सहा महिन्यांच्या गर्भवतीची गच्चीवरून उडी मारून आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.