Ad Advertisement Ad Advertisement

Ebola Outbreak 2026 – इबोला घेऊ शकतो जागतिक महामारीचे रूप

आफ्रिकेच्या सीडीसीचा इशारा : १० हजारांवर रुग्ण, ५ हजार बळी

किंशासा : Ebola Outbreak 2026 काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात (डीआरसी) इबोलाचा उद्रेक झाला आहे, पण यावेळी तो नेहमीच्या नव्हे तर बुंडीबुग्यो या दुर्मीळ प्रकारच्या इबोला विषाणूमुळे आहे. या प्रकारासाठी कोणतेही मान्यताप्राप्त औषध किंवा लस उपलब्ध नाही, हीच सर्वात मोठी अडचण आहे. या विषाणूच्या अन्यत्र प्रसाराचा धोका आतापर्यंत म्हणावा तेवढा नव्हता पण आता तो वाढू लागला आहे.

हा उद्रेक मे २०२६ मध्ये डीआरसीच्या इतुरी प्रांतात सुरू झाला. २८ ऑक्टोबरपर्यंत एकट्या डीआरसीमध्ये १०,२७४ नश्चिति रुग्ण आणि ४,९९२ मृत्यू नोंदवले गेले आहेत. डीआरसीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा इबोला उद्रेक असून, २०१४-१६ च्या पश्चिम आफ्रिकेतील साथीनंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्रेक ठरला आहे. आधीच्या सव उद्रेकांपेक्षा तो खूपच वेगाने पसरत आहे, असे अमेरिकेची रोग नियंत्रण व प्रतिबंध संस्था सीडीसीने म्हटले आहे. डीआरसीमधील हा १७ वा इबोला उद्रेक आहे.

विषाणूने ओलांडल्या सीमा

विषाणू आता युगांडा, केनिया आणि नायजेरियापर्यंत पोहोचला आहे. नायजेरियाने २० ऑक्टोबरला पहिला रुग्ण नोंदवला. युगांडातील उद्रेक आटोक्यात आला आहे. युरोपात मे २०२६ पासून या उद्रेकाशी संबंधित चार रुग्ण आढळले आहेत. नायजेरियातील एका रुग्णाला उपचारांसाठी स्वत्झिर्लंडला नेण्यात आले. केनियात दुसरा मृत्यू झाला असून सुमारे १०० निकटवर्तीय विलगीकरणात आहेत.

कोणताही देश सुरक्षित नाही

आफ्रिकेची रोग नियंत्रण व प्रतिबंध संस्था सीडीसीचे महासंचालक डॉ. जीन कासेया यांनी या प्रसाराची तुलना कोविड-१९ शी केली आहे. ह्यसर्व देशांनी हे लक्षात घ्यावे की योग्य उपाययोजना केल्याशिवाय ते सुरक्षित नाहीत,ह्ण असे ते म्हणाले. पहल्यिांदाच आफ्रिकेतील तीन प्रदेशांना इबोलाचा फटका बसला आहे आणि या उद्रेकाचा भौगोलिक वस्तिार अभूतपूर्व आहे, असेही त्यांनी सांगितले. फक्त आफ्रिकाच नव्हे, तर सर्व खंडांनी सज्जता आणि उपचारांची तयारी वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर समाजासाठी आर्थिक अस्थिरता नर्मिाण करणारी गोष्ट आहे; व्यापार वस्किळीत झाला, पुरवठा साखळ्या तुटल्या आणि कुटुंबांचे कमावते सदस्य मृत्यूमुखी पडत आहेत, असेही कासेया म्हणाले.

निधीची चणचण

प्रतिसादासाठी सरकारांनी सुमारे तीन अब्ज डॉलरचे आश्वासन दिले असले, तरी त्यापैकी २ अब्जांहून अधिक रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे कासेया यांनी सांगितले. आफ्रिकी देशांनी स्वत: १२ कोटी डॉलर दिले आहेत. संघर्षग्रस्त भागांत मदत पोहोचावी यासाठी ‘शांततेचा मार्गिका’ (कॉरिडॉर ऑफ पीस) तयार करण्याची मागणी ते नोव्हेंबरमधील आफ्रिकी राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत करणार आहेत. ब्रिटनने आतापर्यंत ७.८ कोटी पौंड दिले आहेत.

लस कुठवर आली?

सध्या या प्रकारावर मान्यताप्राप्त लस नाही, मात्र ऑक्सफर्ड वद्यिापीठासह अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. वद्यिमान इबोला लसींचा या उद्रेकात वापर कसा करावा याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने ३१ ऑगस्टला आपत्कालीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. चाचण्यांचे निकाल येण्यास अजून तीन ते सहा महिने लागतील. आफ्रिकेबाहेरील धोका सध्या कमी मानला जात आहे. या उद्रेकाशी संबंधित एकही रुग्ण अमेरिकेत आढळलेला नाही, असे अमेरिकी सीडीसीने २९ ऑक्टोबरला स्पष्ट केले. ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेनेही उद्रेक गंभीर असला तरी ब्रिटनमधील लोकांना धोका कमी असल्याचे म्हटले आहे.

Read About : Blood Pressure Fluctuations – रक्तदाब नॉर्मल दिसला तरी धोका असू शकतो
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.