नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील प्रकार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Nanded police custody death नवीन नांदेड : चार महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीने पोलीस ठाण्यातच बागायतदार रूमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात घडली. सोमवारी (दि. २) पहाटे घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सुशील महाजन हैबते (३८, मूळ रा. मुदखेड) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहराजवळील धनेगाव येथील एका वीट भट्टीवर सुशील मजूर म्हणून काम करत होता. त्याची पत्नी छाया हैबते (३०) ही चार महिन्यांची गर्भवती होती. मागील काही महिन्यांपासून सुशीलचा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावरून सतत वाद होत होता. याच संशयातून सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सुशीलने पत्नी छाया हिचा गळा दाबून निर्घृण खून केला. या प्रकरणी दीक्षा कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी सुशील विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि त्याला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कोठडीत आणले. दरम्यान, पोलिसांची नजर चुकवून आरोपी सुशील हैबते याने दुपारच्या सुमारास पोलीस ठाण्यातच स्वत:च्या गळ्यातील बागायतदार रूमालाने फाशी लावून आत्महत्या केली.
एसपींनी घटनास्थळी केली पाहणी
आरोपीने पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी आत्महत्या केल्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन हे तातडीने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आले. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई आणि विभागीय तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.
Read About : Three massive black holes – विश्वाच्या बालपणीची तीन कृष्णविवरे सापडली
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.