तरुणाची एजंट महिलेकडून फसवणूक; बनावट आधारकार्डचा केला वापर
marriage scam Gevrai fake Aadhaar card गेवराई : विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली गेवराई शहरातील एका तरुणाच्या कुटुंबाची अडीच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे उघड झाल्याने गेवराई पोलिसांनी तिला बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले असून, या प्रकरणात अद्यात गुन्हा दाखल नसला तरी प्रकरण तपासावर असल्याचे गेवराई पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई येथील तरुणाच्या कुटुंबाचा जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील एका एजंट महिलेशी विवाह जुळविण्यासाठी संपर्क झाला होता. एजंट महिलेने बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुणीला दाखविले. मुलगी पसंत पडल्यानंतर कुटुंबाने एजंट महिलेला ५० हजार रुपये फोन-पेद्वारे, तर दोन लाख रुपये रोख असे एकूण अडीच लाख रुपये दिल्याची माहिती आहे. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी संबंधित तरुणाचा तरुणीशी विवाह लावून देण्यात आला. लग्नानंतर दोघेही गेवराई येथे घरी आले. मात्र, दोन दिवसांतच त्या अल्पवयीन मुलीने घरात राहण्यास नकार दिला. तसेच स्वत:ला इजा करून घेण्याची आणि फाशी घेण्याची धमकी दिल्याने कुटुंबीय घाबरले.
एजंट महिलेने फसवणूक केल्याचा आरोप
लग्नाच्या वेळी तरुणीचे वय २० वर्षे असल्याचे दर्शविण्यासाठी बनावट आधारकार्ड वापरल्याची माहिती समोर आली. सखोल चौकशी केल्यानंतर तरुणी अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच तरुणाने तिला गेवराई पोलीस ठाण्यात नेऊन संपूर्ण हकीकत सांगितली. जालना येथील एजंट महिलेने आपली फसवणूक केल्याचा आरोपही त्याने केला. मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीला बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून, एजंट महिला आणि इतर संबंधितांची भूमिका तपासानंतर संपष्ट होऊ शकेल.
Read About: Arvind Swamy Business Journey : रोजा फेम अभिनेता अरविंद स्वामी स्वतःला ‘वाईट व्यावसायिक’ का मानतात?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.